झम्या

अम्या आणि झम्या दोघे घट्ट मित्र
एकदा काय झालं,
अम्या म्हणाला झम्याला
चल लेका सायबर कॆफेत जाऊ
झम्या म्हणाला,
पण लेका काय करायचं जाऊन?
अम्या म्हणाला, लेका चॆटिंग!
झम्या म्हणाला,बास काय!
पैसे देउन गप्पा? नाय बा!
आपल्याला नाही पटत
अम्या म्हणाला, लेका
ऒर्कुटवर जाऊ फ्रेंडलिस्ट बनवू
गप्पा मारायला चांगली ’कंपनी’ शोधू.....
झम्या म्हणाला नको बाबा नस्ती भानगड
अम्या म्हणाला, हात लेका भित्रं घुबड!
झम्या गेला लगोलग टांग टाकून सायकलवर
अम्याही गेला मग गप्पा हाणायला अड्ड्यावर
अम्यानं गुपचुप लॊग इन केलं
फ्रेंडलिस्टचं शेपूट वाढतच गेलं
टाईमपास तर आता कॆफेतच होउ लागला
झम्यालाही मग रागच आला
मग काय झालं नविनच कोणितरी प्रोफाईल व्हिजिट देउन गेलं
सहजच यानंही मग "ते" प्रोफाईल पाहिलं
व्हिजिट करता करता असं चॆटिंग चालू झालं
आता तर अम्याला ऒर्कुटचं व्यसनच लागलं
"त्या" प्रोफाईलला व्हिजिट तर रोजचीच झाली
करता करता दोघांनाही भेटिची ओढ लागली
शेवटी एकदाची "डेट" ठरली
अम्याला आता कुठं झम्याची आठवण आली
अम्या म्हणाला झम्याला, लेका काय करु?
भेटायला तिनं बोलवलंय....
झम्या म्हणाला मी काय सांगू?
माझंपण सेमच झालंय
मलाही तिनं आवतण धाडलंय
दोघांनाही एकमेकाला ऒल द बेस्ट केलं
डिओ वगैरे जय्यत तयारीनिशी
संकेतस्थळी कूच केलं.....
कॊफीशॊपमध्ये अम्या पोहोचला वेळेआधीच
शोधत होता...
त्या जीन्स आणि व्हाईट टी शर्टला
इतक्या सुंदर मुलिंत "ती" काही दिसेना
जावं परत म्हटलं तर पायही उचलेना
वाट पहायचिही आता हद्दच झाली
अम्यानं सरळ घराची वाट धरली
कॊफी शॊपबाहेर दिसला त्याला झम्या
....उदास....बापुडवाणा.....
चेहरा पाडून बसलेला.....
अम्या म्हणाला काय झालं लेका?
झम्या म्हणाला झालाय खरा लोचा
नाही म्हणालो पण मिही ऒर्कुटवर लॊग इन झालो
चारच दिवसात एका प्रोफाईलच्या प्रेमात पडलो
आज माझिही "डेट" होती....
अम्या म्हणाला, भारिच की लेका
मग माशी कोठे शिंकली?
झम्या म्हणाला, अरे पण ती नाहिच नां आली
अम्या म्हणाला, नाव तरी सांग लेका
झम्या म्हणाला, कसलं नाव अन कसलं काय
प्रोफाईलमध्ये खरं काही सांगतात काय?
तरी पण काहि तरी असेलच नां? अम्या म्हणाला
"ओन्ली फॊर यू".....झम्या सुस्कारला
आता फेपरं यायची वेळ अम्याची होती....
अम्या म्हणाला आणि तू कोण?"फॊर एव्हर युवर्स"?
दोघांनिही मग झम्याकडे पाहिलं
जीन्स आणि व्हाईट टी शर्ट????
लेका तुझी माझी डेट? काय डोकं फिरलंय काय?
अख्खं ऒर्कुट सोडून तुला मिच सापडलो काय?
च्यामारी इतके दिवस आपण एकमेकांशिच बोललो
समोर मुलगी आहे हेच ग्रुहित धरुन चाललो
चल आता आलोच आहोत तर कॊफी तरी घेउ
पहिली वहिली डेट तर साजरी करु!!
परत आता शी घोड चूक करायचीच नाही
मुलगी असल्याची खात्री केल्याशिवाय
डेट ठरवायचीच नाही.....
अम्या आणि झम्या दोघे सायबर कॆफेमध्ये
दोघांनिही आता वेगळं लॊग इन घेतलं आहे
त्याच्या लिस्टमध्ये वेटिंग फॊर यू
आणि याच्या लिस्टमध्ये समवन फॊर यू!
पुन्हा एकदा चॆटिंग जोरात चालू आहे
यावेळसचा धक्का कॊफी शॊपमध्ये नाही
ऒनलाईनच बसणार आहे!!