कलाकुसर चक्क दगडांतून

नेटवरच्या भटकंतीत काही मस्त कलाकुसरी भेटत गेल्या आणि मग त्यांची आवर्जून दखल घ्यावी असं वाटू लागलं त्यासाठी हे खास पान. जिथे कलाकारी कोणाची आहे हे माहीत आहे त्यांची नावासहित दखल.


पहिली कलाकुसर चक्क दगडांतून साकारली आहे. अगदी सहज सोप्पी अशी ही कलाकारी मस्त आहे नां?
 
सकाळपासून कोसळणारा पाउस … भर दुपारचा गुडूप अंधार … मनावर पसरलेला कंटाळा …आणिक मग कविता बिविता… अर्धवट  काहीतरी सुचत जातं… लिहू लिहू म्हणता म्हणता गायबही होतं… आजच्या या पावसाळी दिवसाला साजरं करण्यासाठी ….

तावाराच्या पागोळ्यातून अलगद हातात यावा 
 एक आठवणीतला  पाउस तुझ्याही मनात असावा … 

सर सर बरसणारा. 

पावसाच्या बरसण्यानं कविता फुलावी 
अशी एक सर तुझ्या माझ्यात बरसावी 











Hindi Typing On This Site Is Powered By Quillpad.