बाई आणि गाडी


बायका आणि गाडी चालविणं, रस्त्यावरुन चालणं, रस्ते ओलांडणं यावर इतके प्रॅक्टिकल विनोद आहेत की, त्यावर एक स्वतंत्र पुस्तक निघेल. हे विनोदी अनुभव अस्मादिकांनाही वेळोवेळी आलेले असल्यानं तमाम महिला वर्गाची माफी मागून हे काही गाळीव नमुने सादर करत आहे. तर, एरवी आत्मविश्र्वासानं वावरणाऱ्या बायकांना अशा वेळेसच काय होतं माहित नाही. साधी रस्ता ओलांडायची गोष्ट पण ,पटकन रस्ता ओलांडतील त्या बायका कसल्या? आधी रस्त्याच्या कडेलाच बाॅलरसारखा स्टार्ट घेतील, म्हणजे जागच्या जागीच एक पाय मागे, दुसरा पुढे ,मग पुन्हा उलट असं चारचारदा मान झटकवून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बघतील. मग जरा पुढं आल्यासारखं करतील, पुन्हा एकदा डावीकडे उजवीकडे मानेचे हिंदोळे होतील, मग धावत एकदमच रस्त्याच्या अर्ध्या भागापर्यंत येतील, आता इथे हमखास होणारी क्रिया म्हणजे अर्धा रस्ता व्यवस्थित आलेल्या या बायका अचानकच अबाऊट टर्न करुन परत रस्त्याच्या कडेला जातील. हा खास बायकी रस्ता ओलांडणे प्रकार. म्हणजे शंभरातल्या नव्वद बायका असाच रस्ता ओलांडतात. म्हणून समोरुन बाई रस्ता ओलांडणार असली की, आपण आपलं सावध असावं. ती कधिही मागे परतेल हे लक्षात घेऊनच गाडिचं सुकाणू सांभाळावं. 

एकवेळ पायी चालणारी बाई परवडली पण गाडी चालविणारी नको. समजा तुमच्या पुढे एखादी बाई गाडी चालवत असेल तर तुमच्या वाहन चालविण्याच्या कौशल्याची आणि तुमच्यातल्या संयमाची कमाल मर्यादा तुम्हाला तपासून घेता येते. एक तर हातात स्टिअरिंग घेतल्यापासूनच गोंधळ, की नक्की कुठे जायंचंय आणि डोक्यात पार्लरपासून सासूपर्यंतचे सगळे विषय त्यामुळे गाडी विचारांसारखीच जवळपास उधळलेली असते. चार चाकीवालीपेक्शाही दुचाकीवाली बाई जास्त धोकादायक. "मुक्त मी स्वच्छंद मी" असा सगळा मामला असल्यानं आजुबाजुच्या गाड्या, रहदारी कशा कशाची तमा न करता सगळ्या जगापासून या मुक्त आधुनिक झाशिच्या राण्या आपला वारु मोकळा सोडतात. एक महत्वाचं म्हणजे समोर गाडी चालविणारी जर बाई असेल तर वाहतुकिचे नियम पाळायची जबाबदारी मागच्यावर असते हे पक्कं लक्षात ठेवा. समोरची बाई इंडिकेटर न देता कधिही आणि कुठेही वळू शकते, करकचून ब्रेक मारुन कधिही मधेच थांबू शकते. थोडक्यात पुढच्या बाईचा अंदाज घेतच मागच्यानं गाडी चालविणं हे त्याच्या दृष्टीने सुरक्षेचं. एकदा एक बाई इंडिकेटर न दाखवताच अचानकच वळल्या. त्यांना म्हटलं, काकू वळताना इंडिकेटर देत चला, बरं असतं. तर म्हणाल्या, "अय्या! म्हणजे मी हात दाखवलाच नाही? मला वाटलं मी दाखवला". घ्या. आता ज्या बाईंना आपला स्वत:चा हात वर आहे की खाली हेच समजत नाही त्यांच्याकडून बाकीचे नियम पाळण्याची अपेक्शा काय कप्पाळ करणार? वळण्यावरुन आठवलं समजा, आपल्याला जर डाविकडे वळायचं असेल तर सामान्यपणे आपण काय करतो? तर, आधी इंडिकेटर देत हळू हळू डावीकडे जातो आणि मग वळतो. पण बाई असं कधीच करणार नाही. ती आधी सुसाटपणानं गाडी पुढे काढेल, पुढच्या गाडीला ओव्हरटेक करेल आणि मग तिच्या पुढ्यातून डावीकडे वळेल. की मागचा उलटा पालटाच. मग? मागच्याला ब्रेक कशासाठी दिलेत? पंजाबी सुटच्या ओढण्या तर मागच्या गाडिवाल्याचे डोळे झाकण्यासाठिच असतात अशा त्या मोकळ्या सोडलेल्या असतात. काही बायकांना तर अजबच सवय असते. दोनही पाय खाली सोडून दुचाकी चालविण्याची. आता अशी गाडी का चालवायची ? हे त्यांनाच माहित. पण अशी गाडी चालविणाऱ्या बायकांची संख्या मात्र भरपूर आहे. जरा अतिशयोक्ती आहे पण, बायकांच्या या गाडी चालविण्याला वैतागलेल्या एका सभ्य गृहस्थानी म्हटलं होतं की, रस्त्यावरुन वाहन चालवताना बायका आणि म्हशींना कधिही गृहित धरु नका. त्या तुम्हाला कधी उलटं पाडतील नेम नाही. 
नियमला अपवाद असतात. आहेत. पण, एकुणत बाई आणि गाडी हा टिंगलीचा विषय आहे. तो का? बायकांनो विचार करा.

त.टी.- विनोद हा विनोदातच घ्यायचा असतो. 
 
हे माझे काही इतरत्र प्रसिध्द झालेले ललित लेख आहेत. त्यांचं संपादित रुप. कसे वाटले जरुर सांगा.
 

अफलातून विन्या


हा विन्या म्हणजे अफलातून आहे. त्याला एकच पदवी शोभते, ती म्हणजे ’वल्ली’. याचा श्ब्दकोष इतका भन्नाट आहे की, ऐकणारा क्रुत क्रुत्य होतो. काही काही माणसं कितिही मोठी झाली तरी बंड्या किंवा बाळ्याच किंवा बबडी, बेबीच रहातात नां तसा हा विन्या जन्मापासून म्हणजे त्याच्या जन्माच्या बाराव्या दिवसापासून आजतागायत विन्याच राहिला आहे. खरं तर बायको मुलं असणारा हा संसारी ग्रुहस्थ आहे पण ऐंशी वर्षांच्या दामले आजोबांपासून रिसबुडांच्या सुमेध वयवर्षं चार पर्यंत सगळ्यांचा तो विन्याच आहे. परवा कोणीतरी याला विचारलं की विन्या कुठं चाललास गडबडीत? तर हा म्हणाला सासर्याच्या पोरीनं भाजी आणायला सांगितली आहे, ती आणून टाकतो नाहितर आज गरगट्यावर भागवावं लागेल. ऐकणार्याला आधी कळेचना की विन्याकडे सासर्याची पोरगी कोण आली आहे? मग उजेड पडला की सासर्याची मुलगी म्हणजे विनुची बायको. विचारणारा तसा नवाखा होता म्हणून विन्याच्या उत्तराला दचकला नाहितर एव्हाना सगळ्यांना त्याच्या अशा बोलण्याची सवय झाली आहे. विनू बायकोला कधीच नावानं हाक मारत नाही तिका एकतर सासर्याची मुलगी म्हणतो नाहितर टिळा म्हणतो. सासर्याची पोरगी म्हणजे बायकोचं कौतुक आणि टिळा म्हणजे विन्या बायकोच्या लाडात आला हे आता सगळ्यांना समजलं आहे. म्हणजे आज आमच्या टिळ्यानं मेथिची भाजी काय झकास केली होती किंवा आज टिळ्यानं सिनेमाला न्यायची फर्माईश केली आहे असं तो तिचं कौतुक करताना म्हणतो तर जातो बाबा आज जरा सुट्टी आहे तर सासर्याच्या मुलिला घर आवरायला मदत करतो. नाहितर जेवायला नाही मिळायचं असं तो बोलणार. मघाशी ज्याला तो गरगटं म्हणाला नां त्याचं खरं नाव आहे पिठलं. पण विनुला ते आवडत नाही म्हणून ते गरगटं. याला चार वर्षांची मुलगी आहे तिचं नाव यानच कौतुकानं जुई ठेवलंय पण हा तिला हाक काय मारतो? तर "वाटी". का? याला उत्तर नाही. आले देवाजिच्या मना त्याप्रमाणे विनुबाबाच्या मनात आलं की संपलं. हे काहिच नाही पाटलांचा सुरेश अंगानं किरकोळ आहे तर हा त्याला म्हणतो "फाळकूट" आणि जोशांचा प्रदीप उंचच उंच बारिक आहे तर हा त्याला म्हणतो "ओघराळं". एकदा प्रदीपनं वैतागुन त्याला विचारलंच की का रे मला ओघराळं म्हणतोस? तर पहिली चूक म्हणजे प्रदीपनं हा प्रश्न विचारला आणि दुसरी चूक म्हणजे चारचौघात विचारला. या प्रश्नाला उत्तर म्हणून विन्यानं चेहर्यावर विचारवंताचे भाव आणून प्रदीपला म्हटलं, हे बघ तुझी उंची, तुझं धड आणि त्यावर असणारं डोकं असा एकुण शरिरयष्टिचा विचार करता....असं म्हणून जे वर्णन केलं ते पुढं चार दिवस सोसायटिला हसायला पुरलं. आता विन्या जी नावं पाडतो ती लोक निमुट स्विकारतात. उगाच का? म्हणून उलटं विचारत बसत नाहित. हो, उगाच हात दाखवून अवलक्शण कोण करुन घेणार नाही का?
 

की...

एकदा लग्न झालं की, आपलं आयुष्य सुखात जाईल असं आपल्याला वाटत असतं...
असा वाटण्याची जागा मग,
मूल झालं की...
मोठं घर झालं की...
अशा अनेक इच्छांच्या अंगाने वाढतच जाते.
दरम्यानच्या काळात, आपली मुलं अद्याप मोठी झालेली नाहीत. ती जरा मोठी झाली की सारं ठीक होईल, अशी आपण मनाची समजूत घालू लागतो.
मुलांच्या वाढत्या वयात, त्यांच्या भवितव्याच्या सुंदर स्वप्नांनी आपण आपले दिवस सजवत असतो. मुलं जरा करती सवरती झाली की सारं कसं आनंदानं भरून जाईल, असं आपल्याला वाटत असतं.
आपला नवरा / बायको जरा नीट वागायला लागला लागली की...
आपल्या दाराशी एक गाडी आली की...
आपल्याला मनाजोगी सुटी मिळाली की...
निवृत्त झालो की...
आपलं आयुष्य कसं सुखानं भरून जाईल, असं आपण सतत स्वतःशीच घोकत असतो.
खरं असंय, की आनंदात असण्यासाठी, सुखात असण्यासाठी आत्ताच्या वेळेपेक्षा दुसरी योग्य वेळ कोणतीही नाही.
आयुष्यात आव्हानं तर असणार आहेतच. ती स्विकारायची आणि ती झेलता झेलताच आनंदी राहायचा निश्चय करायचा हेच बरं नाही का?
जगायला - खरोखरीच्या जगण्याला - अद्याप सुरुवात व्हायचीये, असंच बराच काळ वाटत राहतं.
पण, मध्ये बरेच अडथळे असतात. काही आश्वासनं पाळायची असतात, कोणाला वेळ द्यायचा असतो, काही ऋण फेडायचं असतं....
आणि अगदी शेवटी कळतं, की ते अडथळे म्हणजेच जीवन होतं.
या दृष्टिकोनातून पाहिलं की कळतं,
आनंदाकडे जाणारा कोणताही मार्ग नाही.
आनंद हाच एक महामार्ग आहे.
म्हणून प्रत्येक क्षण साजरा करा.
शाळा सुटण्यासाठी... शाळेत पुन्हा जाण्यासाठी... वजन चार किलोने कमी होण्यासाठी... वजन थोडं वाढण्यासाठी... कामाला सुरुवात होण्यासाठी... एकदाचं लग्न होऊन जाऊदे म्हणून... शुक्रवार संध्याकाळसाठी... रविवार सकाळसाठी... नव्याकोऱ्या गाडीची वाट बघण्यासाठी... पावसासाठी... थंडीसाठी... सुखद उन्हासाठी... महिन्याच्या पहिल्या तारखेसाठी... आपण थांबून राहिलेले असतो. एकदाचा तो टप्पा पार पडला की, सारं काही मनासारखं होईल, अशी आपणच आपली समजूत घातलेली असते. पण, असं काही ठरवण्यापूर्वी आनंदी होण्याचं ठरवा.
आता जरा या पुढे दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या पाहू -
१ - जगातल्या पहिल्या दहा सर्वांत श्रीमंत माणसांची नावं सांगा पाहू.
२ - गेल्या पाच वर्षांत विश्वसुंदरी किताब मिळवणऱ्यांची नावं आठवतायत?
३ - या वर्षीच्या पाच नोबेल विजेत्यांची नावं सांगता येतील?
४ - गेल्या दोन वर्षांतल्या ऑस्कर विजेत्यांची नावं लक्षात आहेत का?
हं! काहितरीच काय विचारताय? असं तर वाटलं नाही ना तुम्हाला? पण, असं वाटलं नसलं तरी, या प्रश्नांची उत्तरं देमं तसं सोपं नाहीच, नाही का?
टाळ्यांचा कडकडाट हवेत विरून जातो.
पदकं आणि चषक धूळ खात पडतात.
जेत्यांचाही लवकरच विसर पडतो.
आता या चार प्रश्नांची उत्तरं द्या पाहू -
१ - तुमच्यावर ज्यांचा प्रभाव आहे अशा तीन शिक्षकांची नावं सांगा बरं.
२ - तुम्हाला अगदी तातडीची गरज असताना मदत करणाऱ्या तीन मित्रांची नावं सांगता येतील?
३ - आपण म्हणजे अगदी महत्त्वाची व्यक्ती आहोत, असं तुम्हाला वाटायला लावणाऱ्या एखाद-दोघांची नावं सांगता येतील तुम्हाला?
४ - तुम्हाला ज्यांच्याबरोबर वेळ घालवायला आवडतो अशा पाच जणांची नावं सांगा बरं.
क्षणभर विचार करा.
आयुष्य अगदी छोटं आहे.
तुम्ही कोणत्या यादीत असाल? काही अंदाज लागतोय?
मी सांगतो.
जगप्रसिद्ध व्यक्तींच्या यादीत तुमचं नाव नक्कीच नाहिये. पण, हा मेल ज्यांना आवर्जून पाठवावा असं मला वाटलं, त्यांच्या यादीत तुमचं नाव नक्कीच आहे....
आता एक गोष्ट.
काही वर्षांपूर्वीची. सिएटलच्या ऑलिम्पिकमध्ये शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झालेले नऊ स्पर्धक स्पर्धा सुरू होण्याच्या संकेताची वाट पाहात जय्यत तयार उभे होते. ही सारी मुलं शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या अपंग होती.
पिस्तुलाचा आवाज झाला आणि शर्यत सुरू झाली. साऱ्यांनाच पळता येत होतं असं नाही. पण, प्रत्येकाला स्पर्धेत भाग घ्यायचा होता आणि महत्त्वाचं म्हणजे जिंकायचं होतं.
धावता धावता एकाचा तोल गेला. काही गोलांट्याखाऊन तो पडला आणि रडू लागला.
त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून अन्य आठही जण पळायचे थांबले.
सारे मागे फिरले... सारे जण...
"डाउन्स सिन्ड्रोम'ची व्याधी असलेली एक मुलगी त्याच्या जवळ बसली. तिने त्याला मिठी मारली आणि मग विचारलं, ""आता बरं वाटतंय?''
मग साऱ्यांनी त्याला उभं केलं आणि अंतिम रेषेपर्यंत सारे खांद्याला खांदा लावून चालत गेले.
ते दृष्य पाहून मैदानावर उपस्थित असलेले सारेजण हेलावून गेले. उभे राहून मानवंदना देत साऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. बराच काळ त्या टाळ्यांचा आवाज आसमंतात गुंजत होता...
त्यावेळी तिथे उपस्थित असलेली मंडळी अजूनही त्या घटनेची आठवण काढतात.
का?
कुठेतरी आत खोलवर आपल्याला प्रत्येकाला ठाऊक असतं की आयुष्यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती स्वतःसाठी जिंकण्यापेक्षा कितीतरी मोठी असते.
आयुष्यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे इतरांना जिंकायला मदत करणं. त्यासाठी वेळप्रसंगी आपला वेग कमी करावा लागतो किंवा अगदी शर्यतच बदलावी लागते.
शक्य तितक् या लोकांना हे सांगा. त्यानं आपलं हृदयपरिवर्तन घडून येईल. कदाचित इतरांचंही...
दुसरी मेणबत्ती लावण्यासाठी वापरल्याने पहिल्या मेणबत्तीचं काहीच कमी होत नाही. नाही का?
 

खुप् पाऊस पडतो तेव्हा कोणाला काय वाटतं?शिशु वर्गातला मुलगा-

मोथ्या मोथ्या ढगांनी वाटतं, अगदी खाली यावं
धगालाच तोंद लावुन त्यातलं पानी प्यावं

पहिलीतला मुलगा-

खुप पाउउस पडतो तेव्हा वाटतं, रस्त्याची नदी व्हावी
दफ़्तराच्ं होडकं करुन तिला पार करुन जावी

चौथीतली मुलगी-

कोसळत असतो पऊस जेव्हा तेव्हा मला वाटतं वीज व्हावं
मला त्रास देणार्यांच्या कानाजवळ कडाडावं

आठवीतली मुलगी-

वह्या पुस्तकं हातामधली आईनं येउन काढुन घ्यावीत
गरमागरम कांदाभजी तिनं मला खायला द्यावीत

कॊलेज कुमार-
भिजण्यासाठी गच्चीत जावं, समोरच्या गच्चीत ‘ती’ असावी
दोन्ही गच्च्यांमधे तेव्हा आणखी कोणीच माणसं नसावीत

मध्यमवयीन ग्रुहस्थ-

गाड्या पडाव्यात बंद आणि दांडी मारायची संधी घ्यावी
पोरं जावीत भिजायला, अन बायको तेव्हा लाडात यावी

व्रुध्द् ग्रुहस्थ: वय वर्शे ८५-

वाटतं, तुंबलेल्या पाण्यात बुडुन मरावं
जगण्यात आता राहिलंय काय?
 

पत्ता

लोक आपल्या घराचा पत्ता सांगताना कसा सांगतात कधी नीट ऐकलंय? जितके स्वभाव नां तितक्या प्रकारानं हा पत्ता सांगितला जातो. म्हणजे बोलायला अघळपघळ माणसं कसा सांगतील बघा, ते रामाचं देउळ नाही का? ते हो पेशवेकालिन आहे ते? काय बांधकाम आहे, अजुनही भक्कम उगाच नाही? नाहितर अलिकडच्या इमारती, दोन वर्षात गळती चालू (इकडे पत्ता बेपत्ता), हां तर ते रामाचं देउळ आहे नां त्याच्या डाव्याबाजुनं वळून लगेच उजवीकडे या. काही जणांना कसं यायचं यापेक्शा कसं नाही हे सांगायची भलती हौस असते. हे लोक असं सांगतील, सरळ आला नां पुढे तर एक मोठ्ठं वडाचं झाड लागेल, त्याला मस्त पार वगैरे आहे बांधलेला, ते एकच झाड आहे इतकं मोठ्ठं, तर त्या झाडाकडे नाही जायचं त्याच्या आधी एक चौक आहे तिथुन वळा. म्हणजे आधी पुढे जाउन आपण तो ऐतिहासिक वड पाहून यावा असं यांना वाटतं की काय? हे तर काहिच नाही. एका बाईंनी अमुकचं घर कुठे असं विचारल्यावर सांगितलं गणपतिच्या देवळाच्या दरवाजाच्या समोरचा वाडा, बाईंना म्हणलं मंदिराला दरवाजे दोन आहेत त्यातला नक्की कोणता? तर त्या म्हणाल्या, अहो देवळातला हत्ती आहे नां त्याच्या पाठिची बाजू. इतका विनोदी पत्ता खरं सांगते अजून कोणी ऐकला नसेल. म्हणजे आधी देवळात जायचं, हत्तिला पहायचं त्याचं तोंड न पहाता तो कोणत्या दिशेला पाठ करुन उभा आहे हे पहायचं मग त्या दिशेच्या दरवाज्यातून बाहेर पडून समोरच्या विरुध्द दिशेच्या दारातून आत गेलं की आम्हाला आमचं घर मिळणार होतं.


 

आडवाट

कधी कधी आपण वाट चुकतो. म्हणजे "तशी" वाट नाही हं, तर साधी चार माणसं कशी नवख्या ठिकाणी वाट चुकतात तशी वाट चुकतो, रस्ता हरवतो, म्हणजे मुळात तो सापडलेलाच नसतो मग आपण नुसतेच भिरभिर भिरभिर इकडे तिकडे जात रहातो, बहुतेक इथेच वळायचं होतं वाटतं, हा सरळ गेलेला रस्ताच घ्यायचा होता वाटतं, असा अंदाज करत चालत रहातो, कधी तरी आडवाटेलाला लागतो आणि मग धस्स होतं. बाप रे! आता? मागे रस्ता लक्शात राहिलेला नसतो पुढच्या रस्त्याचा भरवसा नसतो, मनात भितिचं गच्च गाठोडं पकडून आपण चालतच रहातो.....आणि....अचानकच आपल्याला त्या आडवाटेचं एक विलक्शण सुंदर रुप दिसतं. आपण त्या वाटेच्या त्या क्शणी प्रेमात पडतो. पुढच्या वेळेस न चुकता त्या चुकिच्या वाटेनंच जातो. ती चुकिची वाट, आडवाट आपल्यासाठी रुळून कधी जाते समजतही नाही. तुम्हाला भेटलिय कधी अशी आडवाट? तुम्ही पडलाय प्रेमात अशा आडवाटेच्या? माझं आणि आडवाटांचं तर बहुदा मागच्या जन्मातलं नातं असावं असं वाटतं. रस्ता चुकणं हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. एखाद्यावेळेस न चुकता ठरलेल्या ठिकाणी गेलं तरच मला चुकल्या चुकल्यासारखं वाटतं. रस्ता चुकत माकत पत्ता विचारत ठरलेल्या ठिकाणी पोहोचलं की कसं काहितरी जिंकल्याचं समाधान दरवेळेस मिळतं. मागे काय झालं? एका रविवारी सुस्तावून सांगलिच्या घरात बसलो होतो, दुपारी घाई घाईत भैय्या आला म्हणाला चला मला रत्नागिरिला काम आहे, एकटा जायला बोअर होईल तुम्हिही बसा गाडीत, माझं काम आटपेपर्यंत तुम्ही रत्नागिरीत भटका आपण एकत्रच परत येउ. मग घरात बसायचं ते गाडीत म्हणून सगळ्यांची बुडं गाडीत नेउन टाकली. सगळी जमवाजमव होईपर्यंत निघायला सात वाजले आणि तिथे पोहचायला बारा. अशा अपरात्री एखाद्या गावात गेलं नां की त्या गावाचं एक वेगळंच रुप दिसतं. मग अशा निरव रात्री हे होटेल ते होटेल करत अखेर एक हॊटेल मिळवून तिथे आमची बोचकी घोरत पडली. दुसर्या दिवशी भैय्या गेला त्याच्या कामाला, मग आम्हीही नुसतं हे बघ ते बघ करत रत्नागिरीत भटकलो. तरी अजुन सकाळही ओलांडली नव्हती. मग ठरलं चला आता गणपतीपुळ्याला जाऊ. पहिल्यांदा वाटलं हातखंबा मग गणपती पुळे करत जाउन येईपर्यंत उशिर होईल पण बसून काय करायचं म्हणून गेलोच. नेहमीप्र्माणे मस्त वाट चुकुन बरोब्बर उलट दिशेने मजेत चाललो होतो. बरंच पुढं आल्यावर समजलं, विचार केला इतकं उलटं जाण्यापेक्शा जाऊ असंच जिथे जाईल तिथे. मध्ये एक दोन पंचे भेटले त्यांना विचारलं तर म्हणाले जा जा या रस्त्यानेही पुळं येतं. म्हटलं चला कधी तरी का होईना पोहचुच आपण गणपती पुळ्याला. वाटेत एक पाटी दिसली "आरे-वारे पूल" नाव वाचून आम्ही आमची करमणूक करुन घेत चाललो. कुठुन कुठे गेलो कसे गेलो काय माहित? पण अचानकच समुद्र दिसायला लागला आणि आम्ही चक्क पुळ्यात पोहोचलो होतो. दिवस तिथे घालवला आणि संध्याकाळी सहा वाजले तशी जाग आली की आता परत जायला पाहिजे. अजून सूर्यदेव होते पण आम्ही रत्नागिरीत पोहोचेपर्यंत काही त्यानं साथ नसती दिली. एका काकांकाडे हातपाय धुवायला गेलो, त्यांचं घरगुती लॊज होतं, काका भारी उत्साही निघाले. गप्पिष्ट होते. त्यांनी विचारलं की, नव्या रस्त्यानं जाणार का? लवकर पोहोचाल आणि रस्ता अगदी फोरिनसारखा आहे. आम्ही काय? एका पायावर तयार. त्यांनी कसं जायचं, कुठे वळायचं ते सांगितलं. आम्ही तिथे वळलो, पुढे जाउन रस्ता चुकलो, चुकत परत रस्त्याला लागलो, काकांच्या खुणा दिसायला लागल्या. म्हटलं अरेरे! काकांचा फोरोनचा रस्ता बहुदा हुकला. आपण वाट चुकलो तिथे गडबड झाली..........असावी असं म्हणून वाक्य पूर्ण करायचं विसरुन समोर बघतच राहिलो, गाडिचा गियर कधी बदलला, रस्त्याकडेला कधी घेतली आणि ती बंद करुन उतरलो कधी काही समजलंच नाही त्या रस्त्यानं, त्या वळणानं आणि त्या रुपानं नजरबंदी केल्यासारखे खिळून उभे राहिलो. बाप रे! काय सुंदर दिसत होतं सगळीकडे. आम्ही उंच डोंगराच्या कडेकडेने कोरलेल्या रस्त्यावर उभे होतो आणि खाली निळाभोर समुद्र असा या हातापासून त्या हातापर्यंत पसरलेला होता. लाडावलेलं पोट्टं असतं नां तसा खोडकर मस्त निळा निळा समुद्र, त्याच्या शुभ्र फेसाच्या कुरळ्या लाटांच्या बटा, हिरवीकंच झाडी, सौंदर्याची सगळी लक्शणं तिथे होती. त्या रस्त्यानं समुद्राचं बोट पकडून आम्हाला कधी रत्नागिरीत आणून सोडलं समजलंच नाही. पलक झपकते म्हणतात नां तसे आम्ही आलो. आणि हो एक सांगायचंच राहिलं, येताना आम्हाला जो "आरे वारे" पूलाकडे असा बोर्ड दिसला होता नां, तो हाच रस्ता बरं कां.
 

A BEAUTIFUL PRAYER

I asked God to take away my habit. God said, No. It is not for me to
take away, but for you to give it up.
I asked God to make my handicapped child whole. God said, No. His
spirit is whole, his body is only temporary
I asked God to grant me patience. God said, No. Patience is a
byproduct of tribulations; it isn't granted, it is learned.
I asked God to give me happiness. God said, No. I give you
blessings; Happiness is up to you.
I asked God to spare me pain. God said, No. Suffering draws you
apart from worldly cares and brings you closer to me.
I asked God to make my spirit grow. God said, No. You must grow on
your own! but I will prune you to make you fruitful.
I asked God for all things that I might enjoy life. God said, No. I
will give you life, so that you may enjoy all things.
I ask God to help me LOVE others, as much as He loves me. God
said...Ahhhh, finally you have the idea.

THIS DAY IS YOURS DON'T THROW IT AWAY

May God Bless You, "To the world you might be one person, but to one
person you just might be the world"
 

म्हणे

यांना म्हणे पाऊस रिमझिम वाटतो
पावसाच्या झिम्मड सरीत मनमोर यांचा नाचतो
कसला मोर अन कसलं काय
डबक्यातुन पाय उचलत घर गाठणं यात काव्य आहे काय?

यांना म्हणे थंडी गुलाबी वाटते
शालितली हुडहुडीही उबदार भासते
कोणाला माहित थंडिचा रंग कसा असतो?
थंडिचा मौसम तर व्हॆसलिन फासण्यात जातो

यांना म्हणे उन्हाळाही भारी शितल वाटतो
बर्फाचा गोळा, ऊसाचा रस तलखी भागवतो
मला सांगा सगळेच रुतु कसे हो यांना आवडतात?
कामधंदा सोडुन काय बर्फाचे गोळेच खात बसतात?

 

अगं बाई खरं की काय?

त्यांनी म्हणे प्रेम केलं....
अगं बाई खरं की काय?

प्रेम केलं ते केलं
वर पुन्हा लग्नही केलं
आमचं आपलं एकच प्रकरण्
फुशारकिनं सांगितलं
म्हणुन म्हटलं
अगं बाई खरं की काय?

प्रेम झालं, लग्नही झालं
मुलं बाळं सगळ कसं
वेळच्यावेळी जिथल्या तिथं,
आमचं आपलं सगळंच आखिव
फुशारकिनं सांगितलं
म्हणुन म्हटलं
अगं बाई खरं की काय?

मुलं बाळं मोठी झाली
कर्ती सवर्ती शिंगं फुटली,
आता तरुणपणच ते
प्रेमाबिमात पडायचंच,
पण नाही म्हटलं ,
आमच्या संस्कारात हे बसायचं नाही
फुशारकिनं हे ही सांगितलं
म्हणुनच म्हटलं
अगं बाई खरं की काय?
गाईला शिंग आत्ताच फुटली काय?
 
हे काव्य त्या सगळ्या कामवाल्यांना, ज्या त्यांचा अमूल्य वेळ खर्च करुन वेळात वेळ काढून आपली कामं करुन आपल्याला उपक्रुत करतात. (चाल-रुपेरी वाळूत)
सकाळी सकाळी माझ्या गं घरात तू ये नां
काथ्या आणि साबण घेउन भांडी तू घास नां
भांडी तू घास नां, धुवून ठेव नां

भांड्यांचा ढीग हा असा रचलेला
चमच्यापासून सगळा संसार खरकटलेला
हे सगळं साफ कर नां
भांडी तू घास नां

कपड्यांनी बादली ही भरलेली
ऊरात माझ्या धडकी की भरलेली
लवकर ये ना, साबण घे नां

झाडू बघ कसा दीनवाणा
पोछाही कसा रडवेला
फिनेल घे नां, फरशी पूस नां

घड्याळाचा काटा कसा निर्दयी
तासाच्या टोल्यांनी मन दचकवी
आता तरी ये नां काम तू कर नां
 

गुपचिळी

मला काही बोलायचंय पण शब्द फुटत नाहित
मराठीची बाराखडी, इंग्रजीची अल्फाबेट कोणी मदतीला येत नाहीत
तू, तुला, तुझं, माझं, मला, मी च्या पुढे जीभ रेटत नाही
ती मात्र मला बघतच रहाते मीट मीट डोळ्यांनी
काम होतं काही? विचारते निरागसपणानं
काम? हो नां, नाही म्हणजे असंच आपलं
माझी दांडी गुल होते
कारण नसताना कुठल्यातरी नोटसची वही
माझ्याकडे येउन खुदू खुदू हसते
का होतं असं काही कळत नाही
विचारावं कोणाला तर ते ही सुचत नाही
तुम्हाला माहित आहे?
का बसते ही गुपचिळी?
मी मनातलं सांगितल्यावर खुलेल तिची कळी?
की भडकावेल एक उलट्या हातानं?
कदाचीत म्हणेल तू माझा फक्त मित्र आहेस
कदाचीत म्हणेल तोंड नको दाखवू परत
किंवा कदाचीत काहिच न म्हणता तोंड फिरवेल...
विचारांनीच या मला थंडी ताप येतो
तर ही शहाणी म्हणते सारख आजारी का पडतोस
त्यापेक्शा जाउदे नाहिच काही विचारत
चालंलय ते बरंच आहे