म्हणे

यांना म्हणे पाऊस रिमझिम वाटतो
पावसाच्या झिम्मड सरीत मनमोर यांचा नाचतो
कसला मोर अन कसलं काय
डबक्यातुन पाय उचलत घर गाठणं यात काव्य आहे काय?

यांना म्हणे थंडी गुलाबी वाटते
शालितली हुडहुडीही उबदार भासते
कोणाला माहित थंडिचा रंग कसा असतो?
थंडिचा मौसम तर व्हॆसलिन फासण्यात जातो

यांना म्हणे उन्हाळाही भारी शितल वाटतो
बर्फाचा गोळा, ऊसाचा रस तलखी भागवतो
मला सांगा सगळेच रुतु कसे हो यांना आवडतात?
कामधंदा सोडुन काय बर्फाचे गोळेच खात बसतात?

 

0 comments: