हे काव्य त्या सगळ्या कामवाल्यांना, ज्या त्यांचा अमूल्य वेळ खर्च करुन वेळात वेळ काढून आपली कामं करुन आपल्याला उपक्रुत करतात. (चाल-रुपेरी वाळूत)
सकाळी सकाळी माझ्या गं घरात तू ये नां
काथ्या आणि साबण घेउन भांडी तू घास नां
भांडी तू घास नां, धुवून ठेव नां

भांड्यांचा ढीग हा असा रचलेला
चमच्यापासून सगळा संसार खरकटलेला
हे सगळं साफ कर नां
भांडी तू घास नां

कपड्यांनी बादली ही भरलेली
ऊरात माझ्या धडकी की भरलेली
लवकर ये ना, साबण घे नां

झाडू बघ कसा दीनवाणा
पोछाही कसा रडवेला
फिनेल घे नां, फरशी पूस नां

घड्याळाचा काटा कसा निर्दयी
तासाच्या टोल्यांनी मन दचकवी
आता तरी ये नां काम तू कर नां
 

0 comments: