गुपचिळी

मला काही बोलायचंय पण शब्द फुटत नाहित
मराठीची बाराखडी, इंग्रजीची अल्फाबेट कोणी मदतीला येत नाहीत
तू, तुला, तुझं, माझं, मला, मी च्या पुढे जीभ रेटत नाही
ती मात्र मला बघतच रहाते मीट मीट डोळ्यांनी
काम होतं काही? विचारते निरागसपणानं
काम? हो नां, नाही म्हणजे असंच आपलं
माझी दांडी गुल होते
कारण नसताना कुठल्यातरी नोटसची वही
माझ्याकडे येउन खुदू खुदू हसते
का होतं असं काही कळत नाही
विचारावं कोणाला तर ते ही सुचत नाही
तुम्हाला माहित आहे?
का बसते ही गुपचिळी?
मी मनातलं सांगितल्यावर खुलेल तिची कळी?
की भडकावेल एक उलट्या हातानं?
कदाचीत म्हणेल तू माझा फक्त मित्र आहेस
कदाचीत म्हणेल तोंड नको दाखवू परत
किंवा कदाचीत काहिच न म्हणता तोंड फिरवेल...
विचारांनीच या मला थंडी ताप येतो
तर ही शहाणी म्हणते सारख आजारी का पडतोस
त्यापेक्शा जाउदे नाहिच काही विचारत
चालंलय ते बरंच आहे
 

0 comments: