सीमारेशेची सीमा

सीमारेशेची सीमा

सर्वजण परत आले. सर्वांनी हात टेकले. अखेर सतीनाथ स्वत:च तिसरया मचल्यावर गेले. तीव्र स्वरात म्हणाले,"उध्दटपणालाही काही सीमा असायल हवी छवी, पण पाहुण्यांनी भरलेल्या या लग्नघरात तु जो असभ्यपणा करत आहेस त्याला सीमा नाही! नात्यागोत्याच्या सगळ्यांसमोर तू माझी अब्रु तर धुळीला मिसळवलीसच, पण स्वत:च्या तोंडालाही काळं फ़ासलस. आता मेहेरबानी करुन खाली चल." दाराला टेकुन छवी उभी होती, तीच्या चेहेरयावरचा भाव समजु शकत नव्हता, ती अजुनही तशीच ताठर आहे की थोडी झुकली आहे हे कळायला मार्ग नव्हता. खुद्द सतीनाथांनी वर येउन आग्रह केला तरीही ती पहिल्यासारखाच हट्ट धरुन बसली तर मात्र मान्य करावं लागेल की छवीदेखिल आपल्या नवरयासारखीच वेडी झाली आहे.


पण परिस्थितीत फारसा फरक दिसेना, विलक्शण शुश्क कंठने छ्वी म्हणाली, "दादा तू इथे यायचा त्रास काघेतलास? मी तर आधीच सर्वांना सांगितलय......""ठाऊक आहे." सतीनाथ क्रुध्द स्वरात म्हणाले,"ठऊक आहे, एकेकजण करुन घरचे सगळेजण येउन तुझी मनधरणी करुन गेले आणि तू सगळ्यांना जेवायचं नाही म्हणुन घालवुन दिलंस तुझी वहिनी तर तुझ्या पाया पडुन गेली तरीसुध्दा तू........" भाचीच्या लग्नघरात पहिल्यापासूनच पुढकार घेउन सगळं हौसेनं करणारी छवी ऎन जेवणाच्या वेळेसच गायब झाल्याने मांडवात चर्चेला उत आला होता. सगळेचजण तीला दोषी ठरवत होते. सर्वांना वाटत होतं की आपल्या धमकावल्या गेलेल्या वेड्या पतीची मनधरणी करायला ती अशी निघुन गेली. बडं प्रस्थ असणारे सतीनाथ स्वत: आपल्या लाडक्या बहिणीला मनवायला आले तरिही तिचा हेका एकच होता जेवायचं नाही डोकं दुखतंय. आता सतीनाथानाही त्यांच्या चुकीची जाणीव होऊ लागली. त्यांनी तिच्या नवरयाला असं चारचौघात बोलायला नकोच होतं पण तो भर मांड्वातच अगदी कन्यादानाच्यावेळेसच मांडवात पटकुरं टाकुन त्यावर पुरया, मिठाई, अन्नाचा ढीग लावुन जेवायला बसला म्हणल्यावर सतीनाथांनी चिडुन त्याला हकलुन दिला होता.


..........आणि आता ऎन जेवणाच्यावेळेस छवी बहुदा याचाच राग येउन जेवायला येत नव्हती. पंगत वाढुन ताटकळत होती पण त्याचं तीला काहीच नव्हत? शेवटी रागारगात सतीनाथ ईतकच म्हणाले की..."बेईमान असेच वागतात...." आणि निघुन गेले. याचवेळेस त्यांचा शेजारी असणारा अमल वर काय प्रकार घडलाय ते पहायला आला. पंगत वाढायची जबाबदारी त्याने आपल्यावर घेतली होती आणि एका स्त्रीच्या दुरग्रहामुळे ती खोळंबुन बाराचा काटा १ वर गेला होता. एकेकाळी अमलचं तिच्यावर अव्यक्त प्रेम होतं. पण परीस्थितीवश ते सफल झालं नाही. दुसरीकडे छवीच्या लग्नात तीची फसगत झाली, एका वेड्याशी तिच लग्न लागलं पण तिन १ शब्दाने तिच्या दादा विरुध्द तक्रार केली नाही उलट त्याच्या फुलत्या संसारात तिने तिचं सुख शोधलं असं सगळं असताना आजच असं काय झालं? अमलला प्रश्न पडला.


.........नवरयाच्या वेडेपणाची कोणी थट्टा केली तर ती हसुन उड्वुन लावणारी छ्वी आज जरा विक्शिप्तासारखीच वागत होती हे निश्चित. कदाचित तिला हा सोहळा पाहुन मत्सर वाटत असेल, कोणी सांगावं? छवीनं दार बंद करण्यापुर्वीच अमल दारात आला. चल पाहु आता बास झाला वेडेपणा. तुझं ठिक आहे पण क्शितिजबाबुंना (छवीचा पती) तर जेवायला दे. बिचारे कधीचे भुकेजले आहेत. झालं गेलं संपलं, आता चल पाहु. रागाच्या भरात आज एकवेळ तु त्यांना जेवु देणार नाहिस पण उद्या तर त्यांना जेवावंच लागेल नां? छवी हसली, खरंच हसली. भकासपणे हसली. म्हणाली, " नाही अमल ते आज जेवणार नाहीत. आज नाही, उद्या नाही, परवा नाही कधीच नाही"

छवीच्या या साध्या बोलण्यालाही अमल घाबरला, "छ्वी" तो जोरात किंचाळला. त्याने तिचा दारावरचा हात बाजुला काढुन आत घुसला आणि आत बघुन त्याचा थरकाप उडाला. छवीच्या उध्द्टपणाचे, वेडसरपणाचे कारण पाहुन..........त्याला भान आल्यावर त्याने विचारलं, हे कसं झालं? छवी म्हणाली वेड्याचा वेडेपणा दुसरं काय? साल्याने मला जेवायला दिलं नाही म्हणुन आपल्याच हाताने डोक्यात खिळा मारुन घेतला. अगं पण हे सतीनाथांना सांगायला हवं."नको अमल. आता नको. त्यांचा हा दिवस बरबाद करु नको" "छवी अगं तु रात्रभर एकटीच ईथे बसणार अशीच? तु फथ्थराची बनलेयस का? कसं हे सारं सहन करतेस" " सहन करायलाच हवं अमल. सीमारेषा विसरुन कसं चालेल? त्यांच्या आनंदाच्यावेळी काय मी आपलं..........मी झोपेन आता बहुदा झोप लागेल मला" असं म्हणुन असभ्य आणि उध्दट छवीनं दार धाडकन लावुन घेतलं हो, दार बंद केल्याशिवाय ती राहु शकत नव्हती. सतीनाथांचं बोलणं तिला पटतंय. प्रत्येक गोष्टीला सीमा असते, असायला हवी!

(आशापूर्णा देवी)
 

0 comments: