खुप् पाऊस पडतो तेव्हा कोणाला काय वाटतं?



शिशु वर्गातला मुलगा-

मोथ्या मोथ्या ढगांनी वाटतं, अगदी खाली यावं
धगालाच तोंद लावुन त्यातलं पानी प्यावं

पहिलीतला मुलगा-

खुप पाउउस पडतो तेव्हा वाटतं, रस्त्याची नदी व्हावी
दफ़्तराच्ं होडकं करुन तिला पार करुन जावी

चौथीतली मुलगी-

कोसळत असतो पऊस जेव्हा तेव्हा मला वाटतं वीज व्हावं
मला त्रास देणार्यांच्या कानाजवळ कडाडावं

आठवीतली मुलगी-

वह्या पुस्तकं हातामधली आईनं येउन काढुन घ्यावीत
गरमागरम कांदाभजी तिनं मला खायला द्यावीत

कॊलेज कुमार-
भिजण्यासाठी गच्चीत जावं, समोरच्या गच्चीत ‘ती’ असावी
दोन्ही गच्च्यांमधे तेव्हा आणखी कोणीच माणसं नसावीत

मध्यमवयीन ग्रुहस्थ-

गाड्या पडाव्यात बंद आणि दांडी मारायची संधी घ्यावी
पोरं जावीत भिजायला, अन बायको तेव्हा लाडात यावी

व्रुध्द् ग्रुहस्थ: वय वर्शे ८५-

वाटतं, तुंबलेल्या पाण्यात बुडुन मरावं
जगण्यात आता राहिलंय काय?
 

2 comments:

रोहन... said...

सुंदर .. मानवी भावनांचे यथार्थ दर्शन ... !!!

रोहन... said...

सुंदर .. मानवी भावनांचे यथार्थ दर्शन ... !!!