अफलातून विन्या


हा विन्या म्हणजे अफलातून आहे. त्याला एकच पदवी शोभते, ती म्हणजे ’वल्ली’. याचा श्ब्दकोष इतका भन्नाट आहे की, ऐकणारा क्रुत क्रुत्य होतो. काही काही माणसं कितिही मोठी झाली तरी बंड्या किंवा बाळ्याच किंवा बबडी, बेबीच रहातात नां तसा हा विन्या जन्मापासून म्हणजे त्याच्या जन्माच्या बाराव्या दिवसापासून आजतागायत विन्याच राहिला आहे. खरं तर बायको मुलं असणारा हा संसारी ग्रुहस्थ आहे पण ऐंशी वर्षांच्या दामले आजोबांपासून रिसबुडांच्या सुमेध वयवर्षं चार पर्यंत सगळ्यांचा तो विन्याच आहे. परवा कोणीतरी याला विचारलं की विन्या कुठं चाललास गडबडीत? तर हा म्हणाला सासर्याच्या पोरीनं भाजी आणायला सांगितली आहे, ती आणून टाकतो नाहितर आज गरगट्यावर भागवावं लागेल. ऐकणार्याला आधी कळेचना की विन्याकडे सासर्याची पोरगी कोण आली आहे? मग उजेड पडला की सासर्याची मुलगी म्हणजे विनुची बायको. विचारणारा तसा नवाखा होता म्हणून विन्याच्या उत्तराला दचकला नाहितर एव्हाना सगळ्यांना त्याच्या अशा बोलण्याची सवय झाली आहे. विनू बायकोला कधीच नावानं हाक मारत नाही तिका एकतर सासर्याची मुलगी म्हणतो नाहितर टिळा म्हणतो. सासर्याची पोरगी म्हणजे बायकोचं कौतुक आणि टिळा म्हणजे विन्या बायकोच्या लाडात आला हे आता सगळ्यांना समजलं आहे. म्हणजे आज आमच्या टिळ्यानं मेथिची भाजी काय झकास केली होती किंवा आज टिळ्यानं सिनेमाला न्यायची फर्माईश केली आहे असं तो तिचं कौतुक करताना म्हणतो तर जातो बाबा आज जरा सुट्टी आहे तर सासर्याच्या मुलिला घर आवरायला मदत करतो. नाहितर जेवायला नाही मिळायचं असं तो बोलणार. मघाशी ज्याला तो गरगटं म्हणाला नां त्याचं खरं नाव आहे पिठलं. पण विनुला ते आवडत नाही म्हणून ते गरगटं. याला चार वर्षांची मुलगी आहे तिचं नाव यानच कौतुकानं जुई ठेवलंय पण हा तिला हाक काय मारतो? तर "वाटी". का? याला उत्तर नाही. आले देवाजिच्या मना त्याप्रमाणे विनुबाबाच्या मनात आलं की संपलं. हे काहिच नाही पाटलांचा सुरेश अंगानं किरकोळ आहे तर हा त्याला म्हणतो "फाळकूट" आणि जोशांचा प्रदीप उंचच उंच बारिक आहे तर हा त्याला म्हणतो "ओघराळं". एकदा प्रदीपनं वैतागुन त्याला विचारलंच की का रे मला ओघराळं म्हणतोस? तर पहिली चूक म्हणजे प्रदीपनं हा प्रश्न विचारला आणि दुसरी चूक म्हणजे चारचौघात विचारला. या प्रश्नाला उत्तर म्हणून विन्यानं चेहर्यावर विचारवंताचे भाव आणून प्रदीपला म्हटलं, हे बघ तुझी उंची, तुझं धड आणि त्यावर असणारं डोकं असा एकुण शरिरयष्टिचा विचार करता....असं म्हणून जे वर्णन केलं ते पुढं चार दिवस सोसायटिला हसायला पुरलं. आता विन्या जी नावं पाडतो ती लोक निमुट स्विकारतात. उगाच का? म्हणून उलटं विचारत बसत नाहित. हो, उगाच हात दाखवून अवलक्शण कोण करुन घेणार नाही का?
 

3 comments:

मोरपीस said...

खास आहे

शिनु said...

thx. 4 visiting my blog

Yawning Dog said...

फारच भारी, माझ्या ब्लॉगवरची कमेंट वाचून आलो आणि, इथे बरेच पोस्ट वाचले -
विन्याच पोस्ट मात्र सर्वात छान :)