बाहुलि हरवलि


अलिकडे बाहुली म्हणजे बार्बी असंच समिकरण बनलंय. मला विचाराल तर मला बार्बी छोट्या मुलिंची बाहुली न वाटता मोठी बाईच वाटते. लांबसडक पाय, हात आणि आटोपशिर बांध्याची बार्बी मॊडेल भासते. आम्ही खेळलो त्या बाहुल्या म्हणजे गोबरया गालांच्या कुरळ्या केसांच्या गुटगुटीत, डोळ्यांची उघडझाप करणार्या असायच्या. दुकानातून अंगावर जो ड्रेस घालून यायच्या त्याच ड्रेसवर बिचार्या निमुट आमच्या भातुकलीत वर्षानु वर्ष खेळत असायच्या. बार्बीचं तसं नाही. या बाईसाहेबांचे नखरे तर विचारूच नका. यांच्या पायात उंच टाचेचे सॆंडल्स असतात, ओठांवर लिपस्टिक, अंगात तंग कपडे, हातात पर्स, मोबाईल, पेप्सी सगळं असतं. शिवाय यांचा अख्खा कपडेपटही विकत मिळतो. आमची बाहुली आमची बबडी असायची. तिला झोपवून, चुकवून आम्ही आईसारखे ऒफ़िसला जायचो. बार्बीशी खेळणारी लेक तिच्या सोबतिनं ्पार्टी पार्टी खेळते. बाहुलीच्या खेळातला निरागसपणा जाऊन आता तो स्टायलिश खेळ बनला आहे. भातुकलीतली गोबरी बाहुली हरवली आहे आणि तिची जागा या बार्बीनं घेतलीय याचं वाईट वाटून घ्यायचं की भातुकलीचा खेळही ब्रॆंडेड बनलाय याचं कौतुक करायचं हेच समजेनासं झालंय......
 

3 comments:

Deepak said...

तुमच्या ब्लॉग टेंप्लेट बदलण्यासाठी तुमच्या कमेंटखाली माहिती दिली आहे

Anonymous said...

छान लिहिलंय. आमच्या लहानपणी सायकलच्या ट्युबचे रबरबॅंड्स बनवून त्याचा बॉल पण खेळायला चालायचा. जे काही मिळेल त्यात समाधान मानायचे दिवस होते ते. आजकाल मुलांना पण सगळं काही इझिली अव्हेलेबल आहेच..
लहान मुलं जेंव्हा बार्बीशी खेळतात तेंव्हा खेळ तोच आहे, फक्त साधनं बदललीत. आमच्या लहानपणी बाहुलिचं लग्नं पण लावायच्या मुली. आम्ही नेहेमीचे वऱ्हाडी असायचो.. सुंदर लिहिलंत, फक्त थोडा लहान झालाय लेख, चांगला अजुन मोठा करता आला असता... वाचल्यावर असं वाटतं की अजुन थोडा मोठा असता तर अजुन मजा आली असती.

शिनु said...

@kayvatale

:)
thanks
आम्ही तर रस्त्यांवरून हातानं टायर पळवत न्यायच्या रेसही लावल्य आहेत. :) त्यावेळेस खेळण्यासाठी साधनं कमी होती पण खेळ रंगायचे भरपूर. शिवाय बोअर झालं तर त्यावरचे उपायही आम्हीच शोधायचो. आता दर तासानं या "बोरांना" खेळ पुरवावे लागतात.


बाहु्लीचं लग्न आम्हीही मस्त दणक्यात लावायचो. खरंच यावरही लिहेन कधीतरी सविस्तरपणानं.