आठवणितला गुलाबजाम


त्यावेळेस मी कॊलेजमध्ये जात होते. एका दसर्याला मी आणि भैय्यानं ठरवलं की गुलाबजाम करायचे. साधारण क्रुती (अरे यार, कोणीतरी मला हा प्रॊपर क्रु बरहात कसा टाईपायचा सांगा रे. दरवेळेस क्रुती लिहिताना क्रुर मधला क्रु होतो.) तर गुलाबजाम बनविण्याची साधारण क्रुती माहित होतीच. त्यानुसार सामानसुमान जमवून तयारीला लागलो. खव्याचे गोळे बिळे बनवून मस्त खरपूस तळून बिळून घेतले. साखरेचा पाक बिक बनवला आणि सगळं मुरायला ठेवलं. जेवायला बसल्यावर समजलं की गुलाबजाम ज्यात होते त्या पातेल्याचं आणि त्यात "रूतून" बसलेल्या डावाचं भलंतच प्रकरण जमलंय. अगदी दो जिस्म मगर एक जान है हम टाईप मामला झाला. पाकापासून डाव जुदा व्हायलाच तयार नव्हता. कसंबसं त्यांना एकमेकांपासून दूर केलं. जमेल तसे आणि जसे जमले होते तसे पुरीसोबत गुलाबजाम खाल्ले. जेवण बिवण झाल्यावर दादांनी पाकातले गुलाबजाम काडून वेगळ्या ताटलीत ठेवले साधारण दुसर्या दिवशी त्याची गुलाबजाम कॆंडी टाईप काहीतरी बनलं होतं. तेही आम्ही अर्थातच फ़स्त केले. शेवटचा गुलाबजाम खाताना दादा म्हणाले पुढच्यावेळेस पाक आणखी जरा जास्त "पुढे ने" म्हणजे गुलाबजाम कुरकुरीत तर होतीलच शिवाय खलबत्त्यानं फ़ोडून चूर्ण करून खाण्याचा आणखी एक ऒप्शन ओपन राहिल. पुढे नेटानं मी गुलाबजाम करतच राहिले आणि आज खाणार्यानं पुन्हा घ्यावेत इतपत भारी गुलाबजाम मला बनवायला येतात.
 

4 comments:

भुंगा said...

दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा!

Anonymous said...

तर हे गुलाबजाम तुझ्या अगदी ’घट्” आठवणीत आहेत तर...बरहा मधे कृती टाईप करण्यासाठी..kRutee असे टाईप कर आणि ऑप्शन साठी ~opshan असे टाईप कर...

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा...

shinu said...

@ भुंगा


धन्यवाद.

shinu said...

@ sahajach

:)


"कृती" आणि "ऑप्शन" बाबत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
:)