बायको जेंव्हा बायका बघायला सांगते


जनरली नवरा दुसर्या बाईकडे बघत असेल तर बायकोला राग येतो. सहाजिकच आहे म्हणा. पण असेही काही नवरे असतात ज्यांच्या बायकाच त्यांना दुसर्या बाईकडे "बघ" असं सांगतात. पण थांबा. इतक्यातच, किती भाग्यवान ते नवरे असं वाटून घेऊन हळहळू नका. चंदूची बायकोही अशाच बायकांपैकी आहे. घरात, दारात, रस्त्यावर कोठेही गेलं की ती समो्रून येणार्या बाईकडे चंदूला बघायला सांगते. तोही बिचारा अद्न्याधारकपणे बघतो. तसं बायकांकडे बघायला त्याची ना नसते, मात्र या सगळ्या बायका "७५ एम एम" फ़िगर बाळगणार्या असतात. (विशेष सूचना- जाड, जाड्या, ढब्या, लठ्ठ, अवाढव्य अशा सर्व प्रकारच्या फ़िगर्सबाबत मला व्यक्तिश: सहानुभुती आहे. त्यामुळे वाचकांपैकी कोणी या मापदंडात बसत असेल तर क्रुपया राग मानू नये. बच्चा समझके माफ़ करना :))तर चंदूचं लग्न झाल्यानंतर साधारण वर्षभरानं म्हणजे त्याची चवळीची शेंग क्रमश: बदलत भोपळ्यापर्यंत पोहोचल्यानंतर तिला जाणवलं की आपण जरा जास्तच सुटलो आहोत. सुटलो आहोत हे जरी समजलं असलं तरी कितपत सुटलोय याचा अंदाज तिला येत नसल्यानं तिनं चंदुचं मत अजमावायचं ठरवलं. "चंदू मी किती जाड आहे"? या प्रश्नाला चतुर नवरा जे उत्तर देईल तेच त्यानं दिलं,"छे गं, मला तर तू बारीकच वाटतेस". वरकरणी बायको खुश झालेली असली तरी "आपण जरा सुटलोयच" हा विचार तिच्या मनातून न गेल्यानं सोसायटीतल्या, ओळखितल्या, नात्यातल्या सगळ्या बायकांची नावं घेऊन मी तिच्याइतकी आहे की तिच्यापेक्शा जाड? की तिच्याहून बारीक अशी तोंडी परिक्शा घेऊन तिनं चंदुला हैराण केलं. बाहेर पडल्यावर समोरून साधारण सुटलेली बाई येताना दिसली की ती चंदुला विचारायची,"हिच्यापेक्शा मी किती जाड आहे"? आताशा तर कहरच झालाय, समोरून जाड बाई येताना दिसली की ती चंदुला कोपर रुतवून तिच्याकडे बघायला सांगते आणि डोळ्यानंच विचारते. एव्हाना चंदुलाही याची इतकी सवय झालीय की समोर जरा विस्तारीत फ़िगरवाली बाई दिसली रे दिसली की तो लगेच बायकोनं न विचारता ती त्या बाईच्या मागे आहे की पुढे हे सांगून टाकतो.
 

2 comments:

भुंगा said...

काहीही म्हणा, मात्र चंदु हा - लक्की बॉयच म्हटला पाहिजे. शिवाय, "का किंवा काय किंवा कशाला बघता तिच्याकडे?" अशा ठराविक प्रश्नांची उत्तरे त्याला शोधावी लागत नाहीत ;)

shinu said...

@ भुंगा

खरं आहे, पण डोळ्याच्या लेन्स "वाईड" झाल्यात त्याचं काय?
:)