अलिकडे शब्दांशी तसं काही देणं घेणं राहिलं नाही
कोणी काही बोललं तरी टोचणं बोचणं उरलं नाही

ओशट ओशट मन आणि बोथट झाल्यात भावना
निसरड्या कानावरून शब्दांचे ओघळ नुसतेच घरंगळतात

--------------------------------------------------------------परवा अचानकच जुना गाव वाटेत भेटला
बालपणिचा काळ सुखाचा चटका लावून गेला
जुन्या गावातलं घर माझं आता बरंच पुराणं झालंय
सुरकुतलेल्या म्हातार्यागत डोळ्यात आस पकडून श्वास मोजतंय
जुनेपाणाचं पोतेरं अंगावर घेऊन
शेवाळलेल्या भिंतिंतून आठवणी गच्च पकडून
उभं आहे बिचारं अजुनही पाऊसवारा झेलत
 

2 comments:

DT said...

काय बोलू.... माझही हरवलेल गाव असच आहे...तेव्हा काही शब्दच नाही !!

shinu said...

@ DT

Hmmmm.......
हरवले ते गवसेल काय?