सकाळपासून कोसळणारा पाउस … भर दुपारचा गुडूप अंधार … मनावर पसरलेला कंटाळा …आणिक मग कविता बिविता… अर्धवट काहीतरी सुचत जातं… लिहू लिहू म्हणता म्हणता गायबही होतं… आजच्या या पावसाळी दिवसाला साजरं करण्यासाठी ….
छतावाराच्या पागोळ्यातून अलगद हातात यावा
एक आठवणीतला पाउस तुझ्याही मनात असावा …
सर सर बरसणारा.
पावसाच्या बरसण्यानं कविता फुलावी
अशी एक सर तुझ्या माझ्यात बरसावी
छतावाराच्या पागोळ्यातून अलगद हातात यावा
एक आठवणीतला पाउस तुझ्याही मनात असावा …
सर सर बरसणारा.
पावसाच्या बरसण्यानं कविता फुलावी
अशी एक सर तुझ्या माझ्यात बरसावी
Labels:
एक प्याली चाय के साथ
मी कोण? मी कोण?…मी कोण?
कसं नां की आपलं सगळं वर वर पहाता नीटपणानं चाललेलं असतं आणि तरीही राही उणे प्रमाणे काहीतरी दोन बोटं रितेपण असतंच… निराश असलं की हे रितेपण केवळ आपल्याच वाट्याला आहे असं वाटतं आणि मन शहाणं स्थिर चित्त असलं की हे दोन बोटं उणं रितेपण सगळ्यांच्याच मनात दाटलेलं दिसतं… म्हणजे असं चरचरित दु:ख वगैरे अजिबात नाही तरीही काहीतरी आत हळू हळू बोचणारं,… मी आहे ती खरी की दुसरी कोणी हा प्रश्न कुरतडत रहाणारं… नावामागच्या पदव्या कुठेबरॆ अडगळीत गेल्या हा प्रश्न तर महाभयानक जीवघेणा… बरं पुन्हा पदव्यांनुसार नोकरी म्हणजेच काहीतरी ग्रेट असणं असतं का? हा शहाणा प्रश्नही हळॊच डोकावतो. मुळात काहीतरी नोकरी बिकरी करत रहाणं म्हणजेच काहीतारी साध्य करणं का? मग जे आत्ता हातात आहे त्याचं काय? …. पण मग याचसाठी केला होता का अट्टाहास हा वेडा प्रश्नही तापच देतो… हे असलं सगळं वेडेपणाचं मनात येत असतानाच दोन चिमुकले हात पाठीमागॊन गळ्यात येतात आणि माझी आई वर्ल्डबेस्ट आहे असं मोठ्या डोळ्यानं कौतुकानं म्हणतात.… वर्ल्ड बेस्ट आई होण्यासाठी नां गंमत म्हणजे कोणतीच पदवी लागत नाही. एका बाउल टोमेटो सूप, कधीतरी केलेली दोन मिनिट में तैय्यार मेगी , सरप्राईज म्हणत हातात ठेवलेलं चोकलेट आणि रोज झोपताना कुशीत घेउन सांगितलेली कायच्या काई गोष्ट, एव्हढ्या पाठबळावर वर्ल्डबेस्ट आई होता येतं . इतक्या कमी क्वालीफिकेशानामध्ये मिळणारा हा जगातला अत्युच्च जॉब आहे. पुन्हा परतावा म्हणून मिळणारे आनंदाचे बोनस निराळेच …. हे सगळं घडत सातम नां तेंव्हा गंमत म्हणजे तो दोन बोटं रितेपणा गायबच असतो… तात्पुरता का होई ना..

खूप छान काही ...
दीप्ती नवलच्या अभिनायाप्रमाणे शब्दातपण एक थंडावा आहे. तिच्या कवितातले शब्द शांतपणे कवितेत उतरतात,त्यात धसमुसळेपणा नाही की टोकाच्या भावना नाहीत. तिच्या कविता वाचताना हिमालयातल्या एखाद्या निवांत खेड्यातल्या सुस्त संध्याकाळच फिलिंग येतं.आपल्यात हरवलेले शब्द आणि हळूवार व्यक्त होणारया भावना...
चलो दूर तक
अजनबी रस्तो पे पैदल चले
कुछ न कहे
अपनी अपनी तनहायिया लिये
सवालों कें दायारो से निकलकर
रीवाजो की सरहदो कें परे
हम यू ही साथ चलते रहे
कुछ न कहे
किंवा
जब बहुत कुछ कहने को जी चाहता है ना
तब कुछ भी कहने को जी नही चाहता
किंवा
सर्द! तनहाई की रात
और कोई देर तक चलता रहा
यादों की "बुककल" ओढे...
Subscribe to:
Posts (Atom)