रब ने बना दी जोडी!!


आपल्या हिंदी सिनेमावाल्यांचा एक आवडता संवाद आहे, "जोडीया तो ऊपरवाला बनाता है". आपल्या आजुबाजुला नजर टाकली तर या (न वापरताच जन्मापासूनच गुळगुळीत असलेल्या नव्या पन्नास आणि पंचवीसपैशाच्या नाण्यासारखं)गुळगुळीत वाक्यामधली सत्यता वावरताना दिसेल. तो जो कोणी ऊपरवाला आहे त्याचं "मॅचमेकींग डिपार्टमेंट" सॉलिडच आहे. प्रत्येक नवरा-बायकोच्या जोडीत एक चंमतग सापडेल. म्हणजे नवरा कटकटी असेल तर बायको शांत. बायको पीर्पीर्र करणारी (पिरपिरची सुपरलेटिव्ह डिग्री) असेल तर नवरा कानात बोळे घालून वावरत असल्यासारखा. नवरा हौशी तर बायकोला चिंतांचा डोंगर उपसायला आवडत असणार.(रूकावट के लिए खेद है....)इथे उदाहरण पेरायचा मोह होतोय. लग्नाच्या एका वाढदिवसाला माझ्या ओळखितल्या जोडप्यातल्या नवर्यानं (अरे या नवर्या तला र आणि या योग्य पध्दतिनं लिहायची आयडिया कोणीतरी सांगारे हा नवरा दरवेळेस असा उमटताना पाहून कोण दु:ख होतंय) बायकोला सरप्राईज द्यायच्या उद्देशानं महागडा ड्रेस आणला तर तो पाहिल्यावर बायकोची पहिली प्रतिक्रीय होती-"अगं बाई, आता याला दरवेळेस ड्रायक्लिनला द्यावं लागणार, घरी धुता नाही येणार रे" (नवर्याच्या रोमॅंटिक गिफ़्ट्वर बायकोची इतकी वस्तुस्थितीनिष्ठ प्रतिक्रीया मी तरी अजून ऐकली नाही). बर्याच घरात (पक्षी घराघरात) उलट चित्र असतं. बायकोची महाप्रचंड हौशी असते आणि नवरा डोक्यावर लादी घेऊन वावरत असल्यासारखा थंड. पुन्हा एक उदाहरण पेरण्याचा मोह आवरत नाही. हे अर्थात अस्मादिकांचं आहे. मागे एकदा एका प्रदर्शनात लाकडी राजस्थानी झरोका मला जाम आवडला, म्हटलं घ्यायचा का रे? तर नवरा शांतपणानं म्हणाला, "अगं पण आपली खिडकी तर किती मोठी आहे". यावर त्याच्याकडे हा आला कुठून? असा कटाक्ष टाकून त्याला विचारलं,"तुला काय वाटलं हा एकच झरोका मी आपल्या घराच्या ऍक्च्युली खिडकीला लावणार आहे? बरं तसा लावायचा म्हटला तरी मग मी एकच घेऊया कसा म्हणेन? जितक्या खिडक्या तितके झरोके मागेन नां? पुन्हा आपण फ़्लॅटमध्ये रहातो हवेलीत किंवा स्वतंत्र बंगल्यात नाही. मग हा झरोका खिडकीला लावायला मला हवाय असं तुला वाटलंच कसं" यावर आधिच्याच शांतपणानं (वरून भोळेपणाचा वगैरे आव आणून) हा कसा म्हणतो,"काय नेम बाई तुझा. तुला कसली हौस फ़ुटेल (हो तो हौस फ़ुटली असंच म्हणतो) कोणी सांगावं. कोणत्या तरी साईवर घर सजवायचं काहीतरी पाहिलं असशिल तर मला कसं कळणार"? असो. तर काही जोडप्यात नवर्याला साहसकार्य आवडतं तर बायको आपली जिवाला भिऊन असते. म्हणजे बीचवर गेलं तरी हा आत आता चालत जातो आणि काळजाचे ठोके बिके चुकवत किनार्यावर स्वत:च्या चपला, पर्स आणि नवर्याचे कपडे सांभाळत बसलेली असते. एकाला गतिचं आकर्षण तर दुसर्याला संथ लयिचं, एकाला बोलायला आवडावं तर दुसर्याला गप्प रहायला. या सगळ्या विरोधाभासातसुध्दा एक छानशी लयच असते, म्हणून तर अशी दोन टोकं पकडून असणारी जोडपी वर्षानुवर्षं छान गुण्यागोविंदानं नांदतात. पाण्यात दूरवर चालत जाणार्या नवर्याला माहित असतं की किनार्यावर दोन डोळ्यातलं काळीज आपली अतीव काळजी करत बसलंय म्हणून तर एका टप्प्यावर पावलं किनार्याकडे वळतात. सतत चिंता करणर्या बायकोवर चिडत ती मोकळी व्हावी यासाठी नवरा तिला सुखाचे, आश्चर्याचे धक्के देतच रहातो. निरनिराळ्या हौसांचे (?) झटके येणार्या बायकांच्या नवर्याना ती हौस पुरवण्यात मजाही येतच असते फ़क्त अगं अगं म्हशीसारखा..... प्रकार असतो.
बघा जरा टाका आजुबाजुला नजर आणि शोधा अशा जोड्या.

(citra sau.-weddingabc.net)
 

15 comments:

हेरंब said...

भन्नाट एकदम..

पिरपिरची सुपरलेटिव्ह डिग्री हा हा हा.

आणि ते दुसरं पेरलेलं उदाहरण आमच्या घरात अगदी चपखल बसतंय. असेच समांतर किस्से घडलेले आहेत पूर्वी ;-)

बरं ते 'नवर्‍या' लिहिताना मी गुगल IME चा कीबोर्ड वापरतो. पण तू बरहा वाली आहेस माझ्या मते. तेव्हा बरहा गँगच तुला मदत करू शकेल.

आनंद पत्रे said...

शंभर टक्के खरं शिल्पा, माझ्या मित्रांमध्ये सगळ्यांची अशीच जोडी आहे...

नवर्‍याने असं लिहायचं.... ;-)

(navar^yaane) = This will work..

भानस said...

एकदम पटेश. उपरवाला जोडीयां बराबर चुनचुनकेच बनातायं.... देव म्हणतो मापात पाप नाही करत मी. घर कसे बॅलन्स्ड असले पाहीजे. तुला कसली हौस फुटेल.... हा हा... लई भारी. आवडेश गं.

shinu said...

@ हेरंब

थॅन्क्यु हं.सुपरलेटिव्ह डिग्री लिहिताना मीपण हा हा हा.

तुझ्याही घरात हेच उदाहरण? अगं आई गं यु टू? सगळे कसे एकाच माळेतले मणी?

मी बरहावालीच रे. आता ती तन्वी ही पोस्ट कधी वाचेल आणि मदत करेल पाहू.


ताक.- आनंद पत्रेंनी नवरा सापड्वून दिला. (म्हणजे बहुतेक कारण टाईपून नाही पाहिला अजून)

shinu said...

@ आनंद पत्रे

कहरच आहे. मला या अशा दोन टोकांच्या जोड्या पाहिल्या की मजाच वाटते. असं नक्की काय असतं जे या दोघांना बांधून ठेवत असावं?

नवरा लिहिण्यासाठी मदत केल्याबद्दल धन्यवाद.

"नवर्‍याने" हे शाब्बास. जमैका. :) आता हा नवरा लक्षात ठेवला पाहिजे.(नाहीतरी दर एकाडेक पोस्ट्मध्ये तो असतोच)

shinu said...

@ भानस
....मापात पाप नाही.....ही ही ही. खरंय. अगदी पटेशच गं बाई! ज्याचं त्याचं योग्य ते माप तो पदरात टाकतो.

अपर्णा said...

शिने...र्‍या हे लिहिण्यासाठी पहिला सोप्पा उपाय इथुन चकटफ़ु कॉपी पेस्ट कर आणि दुसरा जो तुला (कदाचित हवा आहे) र लिहिला की shift and ^ मार आणि टाक य झालं...
मी बाकीच्या कॉमेन्ट न वाचता हे लिहिलंय त्यामुळे अजाबात खोडणार नाहीये....(सांगुन ठेवते)
आमच्याकडे पण हीच गत आहे....फ़क्त शांत आणि त्रागा ही मापं प्रसंगासापेक्ष एकदा इकडे आणि एकदा तिकडे असा बॅलन्स करुन घेतो आम्ही....तू चाकुपुराण वाचलं असशील तर मी किती सहनशील आहे हे मलाच जाहिरात करायला नको....

tanvi said...

मस्तच.... एक आहे गो बाई माझ्या मनात असा विचार येतो की बरेच दिवसात शिनूबाईंची पोस्ट नाही आणि ब्लॉगविश्वावर तुझा ब्लॉग हजर हे मागच्या २-३ वेळा झाले .....त्याबद्दल आधि टाळ्या!!!

पोस्ट लय लय भारी.... ते हौशी नवरा आणि शांत बायको हे आमचे आई-बाबा गं!! अगं बाबांना नाटकं सिनीमे प्रचंड आवड आणि मातोश्री ’उन्हाळ्यात उन्हातान्हाचं, पावसाळ्यात पावसापाण्याचं आणि हिवाळ्यात थंडीवाऱ्याच्या जात नाहीत गं!!’ आता बोल!!
बाहेर खाण्याचेही तेच.....

आम्ही मात्र नाही हो असे..... मी जे जे म्हणेन ते नवरा शांतपणे ऐकतो आणि त्यानूसार वागतोही :)
(गेल्या ९ वर्षाचे ट्रेनिंग आहे....उगाच नाही काही.... ;))

shinu said...

@अपर्णा
हो गं हो. सेम पिंच. आमच्याहीकडे प्रसंगसापेक्ष तराजू डुचमळत असतो. (अर्थात रेशो १०:१) :))

र्‍या सापडवून दिल्याबद्दल ध.

तुझं चाकू पुराण वाचलंय गं मी. शेवटी आपण सगळ्याचजणी सेलिंग सेम बोटीतच गं. तुमच्याकडे चाकू आहे आमच्याकडे उदबत्त्या आहेत इतकाच काय तो फ़रक. :)

shinu said...

@ तन्वी

अय्या!! टेलिपथीच की ही. तरीच म्हटलं मला अचानकच अशी लिहायची उचकी का लागते. :)

अबे! आमच्याही ट्रेनिंगला यंदा मे मध्ये नऊ वर्षं होतील. इथल्या वळकट्याही सेम? :)

असो. अशिच वाचत रहा आणि मुख्य म्हणजे पोस्टच्या आठवणी काढत रहा म्हणजे मला लिहायची उचकी लागेल. :)

Maithili said...

"Nirniralya housanche zatake yenarya bayakanchya navaryana ti hous puravanyaat maja yet aste, phakt warun aga aga mhashi prakar..." Agdi kharay mazya aai-babanchya babtit...
Aai chya ati kharedi baddal baba lokana sangtaana sangto " Hichi sagli imitation jwelary vikayala kadhali tar aamhi 7-8 varshe basun khau.." aani kadhi kuthe exhibition la vaigare aai ne kahi vikat nahi ghetale tar svatahun "kahi ghyayache nahiye tula..??" ase wicharun wicharun kahitari ghyayala bhaag paadato.... :)
Baaki tumachi post mastach zaliye..

shinu said...

@ Maithili
wwlcome on blog.
thank u for your reply. :)

meg said...

masta... blog ani tyavarchya comments vachun ase vatate ki maze anubhav na saangtach saglyanna kase bare kalatat?

meg said...

masta... blog ani tyavarchya comments vachun ase vatate ki maze anubhav na saangtach saglyanna kase bare kalatat?

shinu said...

@ मेघना

masta... blog ani tyavarchya comments vachun ase vatate ki maze anubhav na saangtach saglyanna kase bare kalatat?

अगं सोप्पं आहे सगळेच शेम टू शेम बोटिइतून सेलिंगतायत नां :)