चमाला तू चंगतेसा चमी चकए चज्जाम!!
परवा एक मजाच झाली. लेकीच्या शाळेत प्रोजेक्ट डिस्प्ले होता आणि "आईबाबा इन्व्हायटेड" होते. सक्काळी सक्काळी आम्ही आणि इतर लुकलुकत्या डोळ्यांचे पालक वर्गात पोहोचलो. पाच वर्षांच्या पोरांना प्रोजेक्टचा विषय दिला होता, "सोलर सिटिम". अर्थात सगळे ग्रह पालथे घालताना आम्हालाही त्यांच्या बरोबरीनं "गुगलायला" लागलं होतं. प्रकरण चांगलं महिनाभर गाजत होतं. रोज शाळेतून आल्या आल्या नवीन काही ऐकायला मिळत होतं. त्यामुळे प्रोजेक्ट डिस्ल्पेच्या दिवशी नक्की काय असणार? याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. तर वर्गात गेल्यानंतर आधी मुलांची गाणी बिणी झाली मग एक "क्वीझ" चालू झालं. मुलं विरूध्द त्यांचे आईबाबा असे गट होते. आता जनरली कसं चित्र असतं की आपलं पोट्टं नीट उत्तरं देईल की नाही याचं टेन्शन आपल्याला असतं तर अगदी सेम तेच टेन्शन मी चक्क माझ्या समोर बसलेल्या सत्तर चिमुकल्या डोळ्यात बघत होते. एका प्रश्नाचं उत्तर फ़क्त माझ्या (अगं बाई गं हुश्शार गं माझं बबडं ते! :)) नवरयाला आलं. त्यावेळे मुलांच्या गटातल्या माझ्या लेकीनं हाताला झटका देऊन "येस्स" केलं. युनिफ़ॊर्मची नसलेली कॊलर जाम टाईट झालेली स्पष्ट दिसलीच. बाबापण काय मस्त ताठलाच लगेच. त्यानंतर मुलांचे प्रोजेक्ट दाखवणं चालू झालं (बरेचजणांच्या पालकांनिच प्रोफ़ेशनली बनवले होते मात्र माझ्यासारख्या काही वेड्यांनी चक्क मुलांकडून बनवून घेतले होते. असो.) तर पहिलाच प्रोजेक्ट माझ्या लेकीचा होता आणि "बेस्ट प्रोजेक्ट" म्हणून कौतुकाचा वर्षावही होता. टिचरचं वाक्य होतं,"द बेस्ट प्रोजेक्ट ड्न बाय सानियाज मदर"! सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या , मी उठून उभी राहिले, धन्यवाद म्हटलं आणि आवर्जून सांगितलं की मी फ़क्त मदत केली बाकी सगळं सानुनं केलंय. त्यामुळे खरं श्रेय तिचंच आहे (बिचारी सहा तास खपून बोटं दुखेपर्यंत लिहित होती) यावर तर टाळ्यांचा आवाज आणखिनच वाढला. पाचव्या रांगेतल्या दुसरया स्टुलवर बसलेले दोन हात जरा जास्तच जोरात टाळ्या वाजवत होते आणि नजरेत नेहमिचेच भाव स्पष्ट दिसत होते "माय वल्ड्र बेस्ट आई". शाळा सुटल्यानंतर एक माझा आणि एक बाबाचा हात धरून झुलत चाललेल्या लेकीच्या चेहरयावर प्रचंड अभिमानाचे भाव होते. अगदी तसेच जसे तिनं एखादं बक्षिस मिळवल्यावर आमच्या डोळ्यात असतात तसे. गंमत आहे नां?
Labels:
चमाला तू चंगते सा......
Subscribe to:
Post Comments (Atom)
7 comments:
आम्ही पण ह्यातुन गेलोय. अगदी डोळ्यापुढे चित्र उभे केलेत. माझ्या दोन्ही लेकी आता मोठ्या झाल्या आहेत ( कॉलेजात जाते आहे एक अन दुसरी १०वीत) .त्यांचे प्रोजेक्ट्स म्हणजे एक कामच असायचं. शाळांना पण तेंव्हा अक्कल जरा कमिच होती. कुठलंही प्रोजेक्ट सांगायचे. ७ वर्षाची असतांना मोठ्या मुलिला कार्डबोर्ड चं घराचं मॉडेल बनवुन आणायला सांगितलं होतं. तिने तिला जमेल तसं चहाच्या डब्याचं घर बनवुन नेलं तर टिचर रागावली , म्हणे आई बाबांनी मदत केली नाही कां? अपेक्षा असतेच की आई बाबांनी मदत करावी मुलांना.. पण कां?? असो... तुमचा लेख फारच छान झालायं. जुने दिवस आठवले, नंतर मात्र सौ, आणी मी च सगळे प्रोजेक्ट्स करुन देउ लागलॊ.. मग ते राखी मेकिंग असे की बुके मेकिंग असो..( बुके विकतचा असायचा!) :)
Kittti Gooad :)
Sadha ch prasang tumchi chhan fulavun sangitlay. Ravivari sakali sakali vachun prasanna vatla
मस्तच! 'मज्जा' अनुभवाला आली. :-)
सानियाचे कौतुक, अभिनंदन.
@kayvatelte
आई गं, हे भारी आहे. (रेडीमेड बुके-:)). लेख आवडल्याचं आवर्जुन सांगितल्याबद्दल धन्यवाद.
@प्राजक्ता आणि म्रुदुला
धन्यवाद
शिल्पा... तुम्ही तर प्रसंगच उभा केला डोळ्यांसमोर .... खूप छान... :)
Post a Comment