टू इज (पसारा) कंपनी



सुट्टी म्हटलं की "आई आता काय करू" आणि "आई भूक" या दोन राक्शसांचा सामना करणं आलं. जरा पंधरावीस मिनिटं एखाद्या खेळात रमतील तर ते नाही. बरं यांचे खेळ म्हणजे ढीगभर पसारा. तो नंतर आवरता आवरेना असा प्रकार होतो. दिवसच्या दिवस पोरं घरात म्हणजे उच्छाद नुसता. त्यांचा तरी काय दोष म्हणा. आपणच त्यांना ढीगभर अटी घालतो, उन्हात खेळायचं नाही, सतत टीव्ही बघायचा नाही, दुपारच्यावेळेत उगाच कोणाच्या घरात घुसून दंगा करत बसायचं नाही मग सतत घरात बसून त्या बिचार्‍यांनी तरी काय करावं म्हणा. मग सुरू होते उचका पाचकी. हे उचक ते उचक असं करत खेळ रंगतात त्यानंतरचा तो पसाराआवरताना चिड चिड होते खरी, पण पोरं डोकेबाजपणानं खेळताना बघितली तरी काय मज्जा येते म्हणून सांगू. त्यातून पोरांना जन्माला घालताना "त्यानं" जणू काही क्रिएटिव्हीटीच्या नळाखालीच उभी केली होती, इतकी यांची डोकी चालतात. आपण दिलेल्या एका खेळातून पोरं जे विविध डोकेबाज खेळ खेळतात त्याला तोड नाही. आता हेच बघा नां सानू-शमुचं "फ़ार्म विले" किती रंगात आलंय. ताईबाईंच्या बरोबरीनं शमुडीसुध्दा कामाला लागलीय. समजत तर काही नाही पण हे उचक ते उचक करत अख्खी खोली खेळण्यानं भरून टाकून किती मदत करतोय बिचारा.


मॅकॅनोमधले ठोकळे वापरून ताईनं बैलगाडी बनवलीय. खेळण्यात बैलोबा नसल्यानं बिचार्‍या गाईला गाडीला जुंपलंय. एरवी कोल्ह्यांपासून शेताचं रक्शण करावं लागतं पण आमच्या शेतात मात्र कोल्हा, गाढव ही दोस्तमंडळी आहेत.
बैलगा्डीी सैर करायला शेतकरीणबाईंबरोबर त्यांचं बाळसुध्दा चालंलय. शेतकरीणबाई म्हणजे ताई (पुढे गाडी हाकणारी) आहे आणि मागे लंगोट घालून पहुडलेलं बाळ म्हणजे शमु आहे. गाडीत जो चाराआहे तो आंब्याच्या पेटीतून आणून आईला (पक्षी अस्मादिकांना)कामाला लावून भारा बांधलेला आहे.
इथंपर्यंतचा खेळ सौहार्दपूर्ण वातावरणात चालला होता पण शमुलाही खेळावसं वाटलं आणि ताईची बैलगाडी (नव्हे गायगाडी) अशी टांगा वर करून पडली. तिचा गोंधळ आणि याचं टाळ्या पिटत तिच्याकडे खिदळत बघणं यात फ़ार्मविले संपलं (एकदाचं आणि हुश्श)

 

21 comments:

हेरंब said...

>> त्यातून पोरांना जन्माला घालताना "त्यानं" जणू काही क्रिएटिव्हीटीच्या नळाखालीच उभी केली होती, इतकी यांची डोकी चालतात.

हा हा हा.. अगदी अगदी.. आमच्या इथेही त्या क्रिएटिव्हीटी प्रकारचा रोज अनुभव घेत असतो आम्ही. आणि पसार्‍याविषयी तर न बोललेलंच बरं. :)

चला तर, सानू आणि शमूने शिनुला पण (भारा बांधायच्या) कामाला लावलं तर :) मज्जा आहे..

हेरंब said...

अजून एक म्हणजे मी ही याच (गहन) विषयावर पोस्ट टाकतोय लवकरच. अर्धी झालीये. अर्धी ....... होईल लवकरच :)

शिनु said...

हेरंब
तुम्ही आम्ही सगळे सारखेच रे, एकाच मेळ्यातल्या पोरांचे आई बाबा....:)


अरे ते कामाला लावायचं तर विचारूच नको. टोटल वेट लॉस पॅकेज आहे. ग्यॅरंटेड वजन उतरवायचा चंग बांधल्यासारखी पोरं कधी कधी वात आणतात.

शिनु said...

हेरंब

अजून एक म्हणजे मी ही याच (गहन) विषयावर पोस्ट टाकतोय लवकरच. अर्धी झालीये. अर्धी ....... होईल लवकरच :)

येऊ दे येऊ दे आम्ही वाट पहातोय. बाकी दोन मोठी सारखाच विचार (गहन) करतात, थिकं अलाईक की असंच काही नां रे? :)

भानस said...

shinu, अगं कसल्या मस्तच बनवल्यात गं गाड्या. भन्नाट कल्पकता आहे बघ.सानु-शमुचा खेळ होताहोता तुझी फोटोग्राफीपण रंगातच आली होती की. सहीच.बाकी पसा~याबद्दल काय बोलावे....घेशीलच अनुभव पुढे पुढे. पसारा वयातीत आहे बरं,बदलतो तो त्याचा आकार व वयानुरूप निरनिराळे विषय...त्या त्या वयातील निरनिराळे बदलते खेळ.... :D

शिनु said...

@ भानस

हो गं..इतकी मन लावून खेळत होती नां दोघं दृश्टच काढाविशी वाटली...:) मग म्हटलं चला जरा क्लिक क्लिक करत बसू. त्या नादात पसार्‍याबद्दलचा वैताग विसरूनच गेले बघ.

Anonymous said...

>> त्यातून पोरांना जन्माला घालताना "त्यानं" जणू काही क्रिएटिव्हीटीच्या नळाखालीच उभी केली होती, इतकी यांची डोकी चालतात.

अगदी अगदी अगदी गं बाई..... बरं या पिढीसाठी नळंही जरा जास्तच व्यासाचा वापरला असावा....कारण आपल्याला ते यूँ वेड्यात काढतात...

बाकि पसारा सेम पिंच.... आपण चिड चिड करतो ते निर्गूण निर्विकार :)

बैलगाडी मात्र भन्नाटच.... सानू-शमू मस्त ..करा दंगा आई रागावली तर सांगा मावशीने परवानगी दिलीये :)

आर्यन केळकर said...

किती रमुन गेलेत दोघही. मस्तच. आमच्या घरी मी ही आर्यनबरोबर खेळण्यांचा अख्खा टब काढुन बसते आणि थोडा थोडा वेळ सगळी खेळणी उलटी पालटी वाकडी करुन खेळताना वेळ कसा जातो कळतच नाही पण फक्त शनि आणि रविवारी.
सोनाली केळकर

आनंद पत्रे said...

मी सुद्धा (एकेकाळी) असाच खुप पसारा करायचो..
आमच्या आईने मात्र

>> >> त्यातून पोरांना जन्माला घालताना "त्यानं" जणू काही क्रिएटिव्हीटीच्या नळाखालीच उभी केली होती, इतकी यांची डोकी चालतात.

हा विचार केला नसेल याची गॅरंटी ;-)

शिनु said...

@ tanvi

हो गं हो. नळाचा व्यास मुन्सिपाल्टीच्या पाईपलाईनैतका असावा काय? :)

...ते निर्गुण निर्विकार...हे मात्र खरंय.

शिनु said...

@ आर्यनसहित सोनाली

ब्लॉगवर स्वागत. खरंय गं बाई. त्यांच्याशी पसारा मांडून (अर्थात आपला मूड मस्त असेल तर)खेळणं हा सुध्दा आनंदी अनुभवच गं.

आर्यन तू आईला सतावतो का रे असा ताईसारखा भरपूर पसारा करून? :)

शिनु said...

@ आनंद

ही ही ही. अरे तू इतका पसारा केला असशिल नां की आईला ही कल्पना सुचण्याइतकीसुध्दा उसंत दिली नसशिल. बाकी आपण लहानपणी जे पसारे मांडून आपल्या आईवडिलांचा छ्ळ केला होता नां त्याचं पुरेपूर उट्टं आपली पोट्टी काढतात. :)

sudhakar kulkarni said...

Akher mulani suttyat kay karayach.Athava aapale balpaniche divas .Suttya laganyachi aapan kashi vaat baghaycho.Khare tar mulana satat sutya havyat karan shalet kuthe creativity.Te jhalet kondwade naukari karnarya aai bapachya mulasathi.Bhogu dya tyana khare swantratya.Amhi tar kadhich gulam jhaloy aapalyach bhagyache...just cherrish BALPAN

Thank you for interesting article
VISIT MY BLOG FOR SENSATIVE MARATHI POEMS
WWW.SUDHAKARKULKARNI.BLOGSPOT.COM

sudhakarkulkarni said...

Akher mulani suttyat kay karayach.Athava aapale balpaniche divas .Suttya laganyachi aapan kashi vaat baghaycho.Khare tar mulana satat sutya havyat karan shalet kuthe creativity.Te jhalet kondwade naukari karnarya aai bapachya mulasathi.Bhogu dya tyana khare swantratya.Amhi tar kadhich gulam jhaloy aapalyach bhagyache...just cherrish BALPAN

Thank you for interesting article
VISIT MY BLOG FOR SENSATIVE MARATHI POEMS
WWW.SUDHAKARKULKARNI.BLOGSPOT.COM

अपर्णा said...

ए शेतकरीण, तू तिथे फ़ार्मेविले करतेस मग तुझी मोट्या पायपाखाली धरलेली कार्टी आणखी काय करतील असं वाटतं गं तुला?????
तुझ्या फ़ार्मविलची आठवण हेरंबच्या एका पोश्टेत म्या काडलीय वाइच वाचुन घे..
आणि ध्यानं छानच दिसतायत गं....:)

शिनु said...

झाली कां गं सुट्टी? आलीस बयो परत. अगं ती कोणती पोस्ट गं हेरंबची जरा लिंक डकवून दे. मी वाचण्यासाठी मरायला लागले.

शिनु said...

@ sudhakara
स्वागत आणि अगदी खरं आहे. पूर्ण सहमत

अपर्णा said...

http://www.harkatnay.com/2010/05/blog-post.html

he ghe...

रविंद्र "रवी" said...

टु इज पसारा. पण त्या पसार्यात जो आनंद मिळतो तो स्वर्गापेक्षा ही सुंदर असतो.

Management guide said...

Hey u r amazing yar. Being in to IT with One Master degree i could not able to do it.(Shame on Me)
Sanu and shamu (Nice names)are really great that they have got mother like u.
One nice thing that i felt that i found my niece photos and about their activities over the Internet.
Ofcourse it is not a great thing in now a days but see na they both are so innocent (Ofcourse their age)what they plays which message they give.
Sometime we are like AWWWWWW....Oh my god how does she or he understood everything.
They are great and hats of to u.................
Love u all
I am proud of u.


Amri

शिनु said...

@ ujju / amri

hey sis, welcome on blog. :) . we missed u on b'day bash :( nwys thnx for your reply, now keep in touch n keep reading.