काही समानार्थी शब्द

आमच्याकडे सध्या समानार्थी शब्दांचं फ़ॅड आलंय. म्हणजे अमुक एखादा शब्द आणि त्याच अर्थाचा आणखी दुसरा शब्द किंवा मराठी पर्यायी शब्द असं सारखं चालू असतं. आज सकाळी कसाबची बातमी वाचताना, म्हणजे त्याची बातमी हे निमित्त, त्यावरून आणखी काही समानार्थी शब्द सापडले....बघा कसे वाटतायत.

कसाबवरून मेंदूयंत्र चालू झाल्यामुळं त्याच्याचपासून सुरवात करूया-

कसाब = राखी सावंत (दोघंही कधी काय बरळतील नेम नाही)

फ़ुटपाथ = मूनवॉक (कोणत्याही शहरातले फ़ुटपाथ हे एकतर फ़रशा उखडलेल्या स्वरूपात असतात नाहीत फ़ेरीवाल्यांनी ग्रस्त असतात त्यामुळे अल्लाद पाय टेकवला न टेकवला करत चालणं हे मूनवॉकपेक्षा वेगळं ते काय? अर्थात हे भारतातल्या पदपथांच्याबाबत आहे इतर देशांचा आम्हाला अनुभव नाही)

कामवालीबाई = धुमकेतू (धुमकेतू कसा दिसला म्हणता म्हणता गायब होतो तशी बाई आली म्हणता म्हणता कधी गायब होईल याचा नेम नाही)

वयवर्ष सात पर्यंतची पोरं = वात

वयवर्ष सातनंतरची पोरं = ऊत

वयवर्षं पाचपंचविशीची पोरं = फ़याम

लग्नाळू पोरं = गुंड्याभाऊ गडबडे

सासू (कोणत्याही जात, प्रांत आणि भाषेतली) = सायलेन्सर उडालेली लॅंब्रेडा

सून = पाण्यात उभा असलेला बगळा (वरवर शांत वाटणारा पण नेमक्या क्षणी टुचुकन चोच मारणारा, मंडळी सौ सुनारकी, एक लोहारकी विसरू नका :))

मुलगा = सोनाराची नळी (नळी फ़ुंकली सोनारे.....बायको असो वा आई कानात काही कुजबुजल्या की त्यांची पाठ फ़िरायच्या आधीच वारं कानाबाहेर गेलेलं असतं त्यामुळे नवरा नावाचा वाय क्रोमोझोम थंड राहू शकतो)

सासरेबुवा = नेहमी २३ अंशावर स्थीर असणारा एसी

हिमेश रेशमिया = नॅसोमिस्ट ड्रॉप्स

ऑफ़िसमधून आलेला नवरा = खराब केबल प्रक्षेपण

दिवसभर घरात असणारी बायको = भांड्यांनी भरलेला ट्ब (भांड्यांनी भरलेला टब उचलताना एकाचवेळेस सगळी भांडी कचकच आवाज करतात....दिवसभर घारत असणारी बायको नवरा घरी आली की एकाचवेळेस अनेक विषयांवर बोलून त्याला जीव नको करते)
 

18 comments:

अपर्णा said...

नळी फ़ुंकली सोनारे.....ha ha hha...jhakas.....
solid aahet ha samanarthi shabd...saatacha aatala itha nachtay mhanun pakatan miglish madhe comentun takate nahi tar tehi jaaeil....

meg said...

hehe.. masta... creativity chhan aahe samanarthi shabdanchi...!
tuze blogs vachtana maja yete.

btw, comment taklya nantar te word verification ka vichartat? mala jumbled alphabets olakhta yetat ki nahi tyachi pariksha ghetat ka?

शिनु said...

@ aparna


thanku ga thanku.

येत रहा गं अशीच :)

शिनु said...

@ meg

थॅन्क्यु मेग. तुम्ही इतके आर्जवून वाचता नां म्हणून मलाही मजा येते लिहायला. वाचत रहा.

शिनु said...

@ meg

अगं ते व्हेरीफ़िकेशन वर्ड विचारतात म्हणजे डोळ्याचा नंबर बदललाय की नाही याची टेस्ट घेतात. :)

गुगलच्या आकांऊटनी लॉग इन केलं तर बहुदा ही सारखी सारखी आय टेस्ट होणार नाही.

ॐnipr∑s∑nt... said...

what a potent intellectuality you have! Hats off Madam! :-)

शिनु said...

@ om


thanku for your reply. keep reading.

mau said...

hahahhaa..sahi aahe ekdam...mast waatale vachun...

शिनु said...

@ माऊ

धन्यवाद आणि ब्लॉगवर तुझं स्वागर माऊ.

अशिच येत रहा. वाचत रहा.

कृष्णा.....घोडके said...

खुप मस्त लेख लिहला आहे आवडला

शिनु said...

@ krishna

welcome on blog and thak you.
keep reading.

आनंद पत्रे said...

ह्ये जबरदस्त आहे... भन्नाट

Kanchan Karai (Mogaraafulalaa) said...

मस्त! आवडलं. शब्द अगदी चपखल बसतात हो.

शिनु said...

@कंचन

ब्लॉगवर स्वागत :)

आणि धन्यवाद

भानस said...

shinu, कसाब आणि राखी सावंत... अजूनही मी हसतेच आहे... :D फुटपाथ, सासू... एकदम भारीच... आजचा दिस जाम हसणार आहे बघ मी... :)

शिनु said...

@ भानस

थॅन्क्यु गं थॅन्क्यु. अजून काही शब्दांवर काम चालू आहे. त्यावरही पोस्ट टाकेनच लवकरच.

nileshujal said...

it's very nice

arogya.com said...

������ entertaining !