होश्शियार...दात पडणार आहे!

एक दोन महिन्यांपूर्वी सानू शाळेतून घरी आली तीच मुळी गाल फ़ुगवून. हिचं एक कोणत्या गोष्टीवरून कधी काय बिनसेल याचा नेम नाही. दहा पाच वेळा विचारल्यावर अगदी इस्टेट लुटल्यागत आवाजात दीनवाणेपणा आणि डोळ्यात डबडब पाणी आणून तिनं सांगितलं,"आज विशालचासुध्दा दात पडला". मला वाटलं हिच्याच बाकावर बसणार्या हिच्या मित्राचा दात पडला म्हणून हिला प्रचंडसं दु:ख झालंय म्हणून मी आपली तिची समजूत घालत म्हटलं,"हात्त तिच्या. एव्हढंच नां, मग येईल की दुसरा दात. आता पडतातच अगं पहिले दुधाचे दात." माझ्या या समजुतीवर तिची कळी खुलण्याऐवजी आणखिनच भळभळा रडत ती म्हणाली,"अगं बाई मला माहितिय हे. टिचरनं ऑलरेडी सांगितलंय". आता वैतागण्याची माझी वेळ असल्यानं सहाजिकच मी कारवदून म्हटलं,"माहितिय नां माझे आई मग कशाला आल्यापासून इतका गळा काढलायस?" यावर दात पडलेल्यांची यादी वाचत तिनं रडवेल्या सुरात सांगितलं की,"सगळ्यांचे दात पडतायत आणि माझा मात्र अजुनही एकही दात पडला नाही." आत्ता माझ्या डोक्यात उजेड पडला. मानत म्हटलं अशी भानगड आहे होय? मग नव्यानं तिची समजुत काढत तिला सांगितलं की तुझाही पडेलच गं दात. यावर तास दोन तास "कधी"ची भुणभुण करून तिनं नाद सोडून दिला. त्यानंतर मी हे सगळं अर्थातच विसरून गेले आणि परवा शाळेतून येताना माझं बुचकुलं फ़ुदकत घरी आलं. आल्या आल्या खुशित दप्तर फ़ेकत, शुज सॊक्स काढत तिनं आरोळी ठोकली,"आई.......आज काय फ़नी गंमत झाली शाळेत"(हिच्या सगळ्या गमती फ़नी असतात बरं का). "विचार ना काय गंमत झाली ते, आई विचार नां" "बोला काय गंमत आहे?" "असं नाही आधी डोळे मीट....आता उघड" डोळे उघडले तर एका चुटुकल्या दाताला हलवत अगदी जग जिंकल्याच्या अविर्भावात लुकलुकत्या डोळ्यांनी ती उभी होती. हुश्श अखेरीस माझ्या पिल्लाचा पहिला वहिला दात हलायला लागला होता तर. तिला या हलणार्या दाताचा इतका प्रचंड अभिमान वाटत होता की येईल जाईल त्याला अगदी रद्दीवाल्यापासून, कोपर्यावरच्या होमडिलिव्हरी घेऊन येणार्या वाण्यापर्यंत सगळ्यांना कौतुकानं दात हलवून दाखवून झाला. दिवाळीत सांगलीला गेल्यावर तर जवळपास अख्ख्या गावाला समजलं की हिचा पहिलाच दात आता हलत आहे आणि लवकरच तो पडणार आहे. त्यात भर म्हणजे हिच्या बाबानं कौतुकानं हिला सांगितलं की हा दात पडल्यावर त्याजागी सोन्याचा दात येईल म्हणून. मग काय विचारता, कधी एकदा दात पडेल असं झालंय. मात्र या कौतुकातला संभाव्य धोका ओळखून तिला ताळ्यावर आणत सांगितलं की,"गोल्डन दात म्हणजे खरा खुरा सोन्याचा दात नाही काई, या दाताचं नाव कसं दुधाचे दात आहे तसंच नव्या दाताचं नाव गोल्डन टिथ आहे". काही का असेना माझं पिल्लू खुश आहे आणि येता जाता आरशात डोकावत डुलणारा दात कौतुकानं बघत तो पडायची वाट बघतंय. तो डुलणारा दात मला मात्र हेलावून टाकतोय कारण आत कुठेतरी तिचं मोठ्ठं होणं नव्यानं जाणवायला लागतंय. तिचा पहिला दात लुकलुकायला लागल्यावर झालेला आनंद अजून ताजा असताना त्याच दाताचं पडणं तिला नवलाचं तर मला चुटपुट लावणारं ठरतंय. असेच एकेक पाश सैलावत जाऊन माझं पिल्लू मोठ्ठं व्हायला लागलंय याचा आनंद होतोय की आत चुरचुरतंय हेच समजत नाहीए......
 

23 comments:

भानस said...

कित्ती गोड गं.:) दु:खही आभाळाएवढ अन आनंदही गगनात न मावणारा.खरेच गं शिनू अशीच पाहता पाहता लेक कधीनुक मोठी होऊन जाईल...अन मग भुर्रर्रर्रकन उडेल...पण त्या दरम्यानचे तिचे आणि तुझे जग....हे आठवणींचे तुकडे सतत सोबत राहतील.तिच्याही-तुझ्याही.
भापो.

Rohini said...

छान झाली आहे पोस्ट. आता 'Tooth Fairy' येऊन पडलेला दात घेऊन जाणार आणि त्याऐवजी एक छानशी भेटवस्तु ठेऊन जाणार. मला अनुभव नाही पण नुकतीच माझ्या महितीत ही भर पडली आहे :). खरय मुलांचं मोठ होणं आत कुठेतरी हुरहुर लावुन जातं.

aativas said...

interesting write up :)

शिनु said...

@भानस

दु:ख आभाळाएवढं अन आनंदही गगनात न मावणारा.....हंम्म्म खरंय. जे वाटतंय ते "नेमक्या शब्दात" सांगितलंस. धन्यवाद. मलापण भापो. :)

शिनु said...

@ Rohini

धन्यवाद.
हो का, ही टुथ फ़ेअरीची भानगडपण आहेच वाटतं आण्खी. :)

शिनु said...

@ aativas

धन्यवाद. :)

meg said...

kharay agdi! mazya lekicha aanand baghun ashcharyach vatla hota mala... ani meech asvastha zale hote ki baapre aata motha honyachi hi suruvaatach ki!

शिनु said...

@ meg


thanx

Anonymous said...

अग मी कशी नाही वाचली ही पोस्ट...सेम पिंच...मी टाकलेली ’दात’ पोस्ट वाच म्हणजे मी सेम पिंच का म्हणते ते कळेल....आमच्या कडॆ पण चिरंजीवांचा आता तिसरा दात पडणार आहे...
भाग्यश्रीताई म्हणते ते खरय गं!!!! जपाव्या लागतात या आठवणी नाहितर...मुलं कधी मोठी होतात पत्ता लागत नाही!!!!!तुझ्या लेकीला शुभेच्छा!!!
तन्वी

शिनु said...

@ sahajch

i would love to....pan mala ti post sapdlich nahi link de na plz. :)

Anonymous said...

http://sahajach.wordpress.com/2009/04/01/%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%a4/
ही घे लिंक...वाच आणि तुझे मत कळवं...आपण बाया म्हणून सारख्या आहोत की नाही माहित नाही पण आया म्हणून सेम आहोत हे तुझा हा लेख वाचल्यावर समजले बघ!!!
Tanvi

शिनु said...

@ tanvi
तुझा लेख वाचला आणि तिथे प्रतिक्रीयाही दिली. शेम टू शेमच आपणही आणि आपली पोट्टीही.

Anant Ghotgalkar said...

Sakal madhye vachun ya site var aaloy.KHOOPACH CHHAAN.Mi pan thoralya mulich lagna tharavat hoto tevhna ek poetic piece lihila hota "tee mothi ka hotat?' navacha.Tumacha shevatcha paragraph vachtana tyachi aathavan jhaali. pan apan helavalo tari havaldil vhayachi garaj nahi. He karati mothi hotat tevhan aapalyala punha dudhachya datachi mule aanun detat.Believe me they are always more endearing than our own ones.

Anant Ghotgalkar said...

Sakal madhye vachun ya site var aaloy.KHOOPACH CHHAAN.Mi pan thoralya mulich lagna tharavat hoto tevhna ek poetic piece lihila hota "tee mothi ka hotat?' navacha.Tumacha shevatcha paragraph vachtana tyachi aathavan jhaali. pan apan helavalo tari havaldil vhayachi garaj nahi. He karati mothi hotat tevhan aapalyala punha dudhachya datachi mule aanun detat.Believe me they are always more endearing than our own ones.

Vaibhav said...

Just read in Sakal. you are really nice! keep it up. i might want to meet your doughter some day just to buy some chocolates

शिनु said...

@ anat ghotgalkar


हं. खरंय.

लेख वाचून आवर्जून प्रतिक्रीया दिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रतिक्रीया लिहिण्याचा उत्साह वाढवतात.

शिनु said...

@ vaibhaw


अगदी नक्की.

धन्यवाद.

Anonymous said...

very touching. We are just blessed with our first daughter and getting from day 1 to thrid month itself seems significant time. I want the time to freeze or at least slow down. I want to enjoy every second with her.

शिनु said...

@ anonomus

thanku. your comments are precious for me. keep reading :)

संवेदना said...

खुप्च टची.माझी लेक अजुन 4वर्षांचीच आहे पण मला तर आत्तापासुनच ..........भापो ग.

शिनु said...

@संवेदना


धन्यवाद.

शिनु said...

@ संवेदना

ब्लॉग फ़ॉलो केल्याबद्दल धन्यवाद

हेरंब said...

वा. अतिशय सुंदर आणि हळुवार. जाम आवडला लेख. आणि तुमची शैलीही अगदी खुसखुशीतच.. "अगदी इस्टेट लुटल्यागत आवाजात" हा हा हा.. ऑलरेडी फॉलोअर झालोय ब्लॉगचा..

आमचे राजे अजून वर्षाचे पण नाहीयेत. त्याच्या येणा-या (पडणा-या नव्हे :) ) दातांवर मीही २ पोस्ट्स टाकल्या होत्या. वेळ मिळाला तर वाचा.

http://harkatnay.blogspot.com/2010/02/blog-post_05.html

http://harkatnay.blogspot.com/2010/02/blog-post_20.html