"आई तुझ्याच ठायी"....अप्रतिम!

सध्या असं आहे की रोजचा पेपर वाचायलाही फ़ुरसत मिळत नाही तिथे अवांतर वाचन कुठून करणार? पण अचानकच मंगला गोडबोलेंचं "आई तुझ्याच ठायी" हातात पडलं आणि वाचावच लागलं. "बाई" "आई" होते म्हणजे नेमकं काय होतं याचं वर्णन त्यांनी इतकं अप्रतिम केलेलं आहे की. एकदा वाचायला सुरवात केल्यावर ठेववेनाच. आई आणि "मूल" (मंगला गोडबोलेंनी प्रस्तावनेत सांगितल्याप्रमाणे मुलगा आणि मुलगी यांचं संयुक्त संबोधन) हे नातं रूजतं कसं, फ़ुलतं कसं आणि वर्षं सरतील तसं कोमेजत कसं जातं याचं वर्णन इतक्या चपखल शब्दात झालंय की ज्याचं नाव ते. ही पोस्ट लिहिताना त्यातले उतारे देण्याचा मोह आवरू म्हणता आवरता येत नाहीए; पण उतारा द्यायचाच तर कोणता? या संभ्रमापायी त्या वाटेला जात नाहीए. अख्खं पुस्तक, शब्दन शब्द इतका सुंदर अनुभव देतं की ते वाचणंच जास्त आनंद देणारं ठरेल. एक नितांतसुंदर अनुभव देणारं लिखाण वाचायची इच्छा असेल तर हे पुस्तक प्लिज वाचाच असा हट्ट मी धरेन. वाचाल नां? आणि हो वाचल्यानंतरच्या प्रतिक्रीया इथे शेअर करायला विसरू नका.
 

3 comments:

भानस said...

मायदेशात गेल्यावर विकत घेण्याच्या यादीत अजून एक पुस्तक ऎड झाले. तुझ्या नावाजण्यातूनच ते मनाला भावणार हे नक्की. अनेक आभार. वाचले की आपोआपच तुझी आठवण येईल मग बोलूच यावर.:)

shinu said...

@ bhanas

thanku :)

meg said...

bhavnara pustak... ekda suruvaat kelyavar khali thevena!
fakt as you said, end jara drag zala aahe... it took a more of factual likhaan...
pan overall chhaanach!
thanks for suggesting!
i am only waiting to gift it to my sis who HAS ti read it!