सिने में जलन, आंखो में तुफ़ान क्युं है

असं नेमकं काय झालंय की रोजच्या दिवसातला आनंद हरवून गेलेला आहे......आनंद तुमच्या हातात आहे. तो कोणीही तुमची इच्छा नसताना हिरावून घेऊ शकत नाही, असली फ़िलॉसॉफ़ील कोट्स वाचताना एकाचवेळेस आतून बरं वाटत असतं तर मग भंपकासारखं का बरं वाटावं?......आपलं आपलं असं सगळं मस्त चाललं असतानाच असं काय आहे, जे इतकं त्रास देतंय?....छे छे, आपण दु:खात, त्रासात आहोत याचा आनंद कोणी उपभोगत असेल तर आपण का बरं असा आनंद द्यावा त्यांना?....पण हे सगळे शब्दाचे बुडबुडेच....नाही म्हटलं तरी मान्य करायलाच हवं की जखम खोल आहे, आतपर्यंत गेलेली रूतन बसलेली.....पण का कुरवाळ्यावत अशा फ़ुकट जखमा?....लोकांच काय आहे? आज जरी आयुष्यात आहेत उद्या नक्की नसणार आहेत...काल परवा जी होती ती तरी आज कुठे आहेत?....ते दिवस गेले, हेही जातीलच....हा सगळा त्रागा का? ही अस्वस्थता का? काय आहे ही बोच? सगळं काही ठीक असताना मनाची शांतता, समाधान गेलं कुठे? कोणीतरी म्हणजे अगदी शब्दश: कोणीतरी ज्यांचा आपल्या आयुष्याशी काहीएक संबंधही नसतो अशी माणसं आपलं सुख, मनाची शांतता अशी ओरबडून घेऊन निघून जातात आणि आपणही उसासे सोडत बसावं?.....बरं सगळेच आपल्याच मनाचे हिंदोळे....इकडून तिकडे......जाब विचारण्याची हिम्मत नाही आणि माफ़ करून विसरण्याइतका मोठेपणाही नाही....वरवर माफ़ केलेलं असलं तरिही निघतच असते खपली दर दिवशी.....माझी हक्काची माणसं, त्यांच्या आयुष्यात माझ्या असण्यानं खुष असतानाही अशी वैतागवाणी माणसं माझ्या आयुष्यात असण्यानं इतका का फ़रक पडावा?.....नकोच पडायला खरं तर...फ़रक पडतो हेही खरंच....गेले काही दिवस.... नव्हे महिने, या परिस्थितीतून जात असताना स्वत:शी वारंवार विचारलेला, त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलेला हा प्रश्न, सिने में जलन, आंखो में तुफ़ान सा क्युं है? ..... आहे काही उत्तर? लोक असे का वागतात? त्यांच्या वागण्याचा त्रास आपल्याला काहीएक कारण नसताना का होतो? आपल्या चांगुलपणाचा फ़ायदा घेत रहाण्याचा अघोरीपणा करून यांना नेमकं कोणतं सुख मिळतं?...थोडा निर्ढावलेपणा यायला हवा....दूर्लक्ष करता येण्याइतका...गेलात उडत म्हणण्याइतका......गैरफ़ायदा घेताय? असभ्य चेहर्‍यावर सभ्यतेचे मुखवटे ताणताणून चढवताय? मेरी बलासे म्हणण्याइतका......
 

6 comments:

हेरंब said...

कुछ तो लोग वागेंगे
लोगोंका काम है वागना....

aativas said...

कधी कधी होते अशी अवस्था .. सगळ कळत असून न वळण्याची .. उत्तरही आतूनच येत त्याच .. कधी वेळ लागतो इतकच!

श्रिया (मोनिका रेगे) said...

स्वतःचे वागणे हे इतकेच आपल्या हातात असते अश्या निष्कर्षावर मी आले आहे....अनेकांच्या अनेक तऱ्हा आणि खरेतर जगात तऱ्हेवाईकपण बरंच आढळते....आस्मानातल्या पावसाळी ढगांचे जसे सांगता येत नाही तसेच स्वभावाचे पण सांगता येत नाही...
अनेक वेळा घोर लावून जातात अनेक प्रसंग, आणि मग ,"सिने में जलन, आंखो में तुफ़ान क्युं है"...अस वाटू लागते....

Suhas Diwakar Zele said...

चालायचंच....

meg said...

ayyoo....! Evdha kashala ga vichar karteyas?
"Such is life!" asa mhanun zatkun takaychya bochnarya goshti...

If things are not in our control, then don't give a damn!
:) ;)

अपर्णा said...

>>आज जरी आयुष्यात आहेत उद्या नक्की नसणार आहेत...
हे त्रिकालाबाधीत सत्य आहे...म्हणून मागे एकदा म्हटलं होतं मी Dont care attitude आणला पाहिजे..... :P