व्हीसीआर . काॅलनीत कोणाचं लग्न झालं की त्याप्रित्यर्थ, गणेशोत्सवात लेटेस्ट सिनेमे (किमान तीन तरी) मंडळाकडून, उन्हाळ्याची सुट्टी सेलिब्रेट करायची म्हणून, कधी विनाकारण एखादा सिनेमा बघायचाय म्हणून....किती कारणानी हा डबा आणि त्यासोबतच्या त्या काळ्या कॅसेट्स घरात आणल्या गेल्या. सुरवातीच्या काळात तर किती अपूर्वाई असायची या व्हिसीआर नावाच्या भानगडीची.
मध्येच कधीतरी लग्नाचे व्हिडिओ करायची फॅशन आली. मग लग्न झाल्यावर पंधरवडय़ात ती कॅसेट वाजत गाजत यायची एखाद्या दुपारी आजूबाजूच्या, शेजारपाजार आणि नातेवाईकांसोबत प्रिमियर व्हायचा. काय ते कौतुक....😁 'अगं बाई वन्स तुमची साडी काय छान दिसतीय व्हिडोत' किंवा 'अगं बाई बबडी बघ किती गोड दिसतीय' असं साग्रसंगीत कॅसेट बघणं व्हायचं.
कधीतरी सीडी आली आणि कानामागून येऊन तिखट होत स्थिरावली. मधल्या काळात या चौकोनी डब्याचा विसरही पडून गेला होता. या बातमीमुळे पुन्हा एकदा घरबसल्या घेतलेला तो पहिला वहिला होम थिएटरचा अनुभव आठवला.
कसं असतं नं आपल्या माहितीत, नात्यात कोणी पिकल्या केसाचं बुजुर्ग असतं महिनोन महिने ....वर्षानुवर्ष आपण त्यांची खबरबात घेतलेली नसते मग अचानक त्यांच्या जाण्याचीच बातमी येते आणि आपल्याला काय काय आठवत रहातं...तसंच काहीसं.....माझ्या पिढीत जन्मलेल्या आणि आता निरोप घेणार्या या तंत्रज्ञानाला दिल भर के निरोप.😑
थोडं विस्तारानं पुढच्या ब्लॉगमधे

2 comments:
खूपच छान आणि तरल लिहिलं आहे
सागर
Welcome and thank you sagar. Keep visiting
Post a Comment