...........झालं ते झालं म्हणत त्या दिवसापासून जान्हवीनं घरातून लक्षच काढलं. एकाएकी तिला समरची आठवण यायला लागली. आपला निर्णय चुकला ही शंका ममाशी झालेल्या वादावादीनंतर पहिल्यांदाच आली आणि लग्नात कौतुकं पुरवून घेणार्या धनुला पाहून तिला खात्रीच पटली की आपण त्यागा बिगाच्या नशेतच होतो...फक्त आपण....धनू, आई, समर सगळे उघडे डोळे असणारे होते आणि आपल्याच डोळ्यावर गुंगी चढली होती. त्यानंतर पहिल्यांदाच तिनं कोणाकोणाकडून समरचा पत्ता घेतला, त्याचा ई-मेल मिळवला आणि थरथरत्या बोटांनी त्याला एका आवेशातच मेल लिहिली. तिच्या मेलला उत्तर म्हणून समरनं फोटो पाठवले होते, त्याच्या टुमदार बंगलिचे, ज्यात कदाचित जान्हवी राहिली असती, बंगलिसमोरच्या सुंदर बगिच्याचे, जो कदाचित जानुच्या हातांनी फुलला असता, सगळ चित्र समर-जान्हवीनं पाहिलेल्या चित्रासारखंच होतं, अचूक....मात्र त्यातल समरसोबतचा हसरा समाधानी चेहरा जान्हविचा नव्हता, त्या हसर्या चेहर्याशी चिमण्या मुठींनी मस्ती करणारा गोंडस जीव जान्हवीचा अंश नव्हता...चित्राची एक बाजू परिचित होती आणि दूसरी मन भयभित करणारी. तिच्या मेलला उत्तर देण्याची तसदिही समरनं घेतली नव्हती, तिनं जीव तोडून लिहिलेल्या शब्दांना उत्तर म्हणून त्यानं पाठवलेली चार छायाचित्रं तिला सैरभैर करून गेली. यथावकाश फोटोतल्या समाधानी चेहरयाचं आणि कडेवरच्या बाळाचं नावही समजलं. ज्यांच्या तिचा काहीच संबंध नव्हता. धनुच्या संसाराला मदत म्हणून गेलेली ममा तिकडेच रमली. तिच्या आयुष्यातलं धनुचं स्थान पहिल्यांदाच जानुला टोचायला लागलं. एरवी त्यांचं गुळपीठ हा तिच्या थट्टेचा विषय असायचा आता संतापाचा झाला.....
......आयुष्य कोणासाठी थांबतं? आपल्या गतीनं त्याला जितकं पुढे सरकायचं तितकं ते सरकतच रहातं. जानुचं आयुष्यही सरकत राहिलं, तिला नकोसं झालेलं असलं तरी. धनुचं लग्न झाल्यावरचा रितेपणाही हळू हळू सवयिचा झाला. आपली गरज खरं तर कोणालाच नसते हे सगळे आपण निर्माण केलेले पाश असतात....धनुच्या बायकोचं आणि ममाचं रितीप्रमाणे पटेनासं झालं. सुरवातिला त्यांना ममाची गरज होती. तितके दिवस त्यांनी तिच्याशी गोड बोलून काम साधून घेतलं. नंतर नंतर वाद व्हायला लागले. धनुची बायको, श्र्वेता, त्याला सुचवू लागली की तिकडे जानू एकटीच आहे. सगळ्या घरावर कब्जा करेल आपल्या माघारी, मग काय कराल? त्यापेक्षा तुमच्या आईला तिकडे पाठवा, त्यांच्यावर वचक राहिल. धनुलाही हे पटलं त्यानं निमित्त काढून आईला परत पाठवलं. तिला समजलं नव्हतं असं नाही पण धनुशिवाय तिच्या असण्याला तिच्यालेखी काही किंमत नव्हती. सगळं आयुष्य त्याच्याकडे पाहून काढल्यावर आता ती कोणासाठी जगणार होती? जानुकडे ती परतल्यावर या दोघिंचं असं आयुष्य पहिल्यांदाच चालू झालं. दोन टोकांवर रहाणार्या दोघीजणी आधीच एकमेकीसाठी परक्या होत्या. त्यात ममाला अलिकडे काय झालं होतं कोणास ठावून जानुचे पैसेही ती घरासाठी वापरायची नाही. धनुच्या पैशांची वाट पहात रहायची. सगळ्याचा एकीकडे त्रास होत असतानाच सवयही होत होती. श्र्वेताला दिवस गेल्याचे कळल्यावर ममा त्या आनंदाच्या भरात चक्क जानुशी चांगलं बोलली, गोड जेवण बनवलं आणि तिच्याचसोबत जेवायला बसली. दुसर्या दिवशी सकाळी उठून तिनं बॆग भरली, जानुनं विचारलं की बॆग का भरलीस? तर म्हणाली, धनुचा कधिही फोन येईल, तिच्या मदतिला जायला नको? जानूनं विचारलं,"अगं तिची आई आहे नां करायला? तू कशाला दगदग करतेस?" यावर कुठेतरी हरवलेली ममा म्हणाली,"एकच एक मुलगा, त्याचं सगळं व्यवस्थित झालं की मी डोळे मिटायला मोकळी"......
श्र्वेताला मुलगी झाली आणि आईनं तिच्या गर्भारपणातल्या तिसर्या महिन्यापासून सगळं घर सांभाळलं. श्र्वेताच्या आईनं बाळंतपण करायला जमणार नाही म्हणून सांगितलं तर हिनं आनंदानं केलं. बाळाला सांभाळणं, स्वयंपाक सगळं ममा जातिनं करायची. धनुची मुलगी, ईशा वर्षाची झाली. तिच्या वाढदिवसाला गेलेली जानू धनुच्या संसारात पहिल्यांदाच जात होती. बारशाच्यावेळेस अनोळखी माणसांच्या गर्दित हरवलेली जानू अंधार्या गॆलरीत एकटिच उभी होती आणि तिच्या कानावर आतल्या खोलितले संवाद पडले, आतल्या लोकांना बहुदा जानुच्या तिथं असण्याची कल्पना नसावी."अजून किती दिवस सासुला ठेवून घेणार आहेस? आलिय नां तुझी नणंद तिच्यासोबत पाठव तिला." एका पोक्त बाईचा आवाज होता."हो, नां, अगदी गळ्यातच पडल्यात लग्न झाल्यापासून. जरा म्हणून मोकळीक नाही. सतत आपलं धनू धनू करत यांच्यापाठी असतात. उगाच एका माणसाचा जास्तिचा खर्च आम्हीच काय म्हणून सोसायचा? तिकडे त्या मॆडम घरखर्चाला पैसेही देत नाहीत बहुतेक. सतत यांना फोन करत असतात, इतके पैसे दे आणि तितके पैसे दे. यावेळेस मी सरळ सांगणार आहे की आई दोघांची आहे नां, मग खर्चही निम्मा करा. शिवाय आमच्या घरावर कब्जा करून बसल्यात ते वेगळंच. आता या तिथे आयुष्यभर रहाणार म्हणजे ते घर विकताही येणार नाही आणि आम्ही तिकडे जाणार नाही म्हणजे आम्हाला त्याचा काही उपयोगही नाही. इकडे जरा मोठं घर घ्यायचा विचार होता पण तिकडचं घर विकलं तर पैसे वरच्यावर उभे रहातील नां, कुठलं काय या बाईसाहेब जोवर त्या घरात आहेत तोवर आम्हाला काही एक पैसा मिळू द्यायच्या नाहीत." हा आवाज नक्की श्र्वेताचा होता. खरं तर इतकं ऐकल्यावर संतापानं जानुच्या डोळ्यातून घळघळा पाणी यायला लागलं होतं. एकदा वाटलं सरळ समोर जाऊन जाब विचारावा पण मग तिनं ठरवलं की इथेच उभं राहून आणखी काय गरळ ओकतायत ते ऐकावं. आता श्र्वेताची आई म्हणाली,"तरी बरं, अधून मधून गोड बोलून तुम्ही दोघांनी सासुचे दागिने तरी किमान तुमच्याजवळ ठेवून घेतले ते. नाहितर सगळंच तुझी देखणी नणंद हिरावून घेउन बसली असती. स्वत:च्या रूपाचा इतका गर्व आहे तर लग्न का करत नाही? अजुनही किमान एखादा बिजवर तरी नक्की मिळेल" यावर श्र्वेता म्हणाली,"अगं त्यांना म्हणे कोणीतरी मुलानं धोका दिला त्यामुळे यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. अगदी लग्नापर्यंत प्रकरण आलेलं असताना तो पळून गेला म्हणे परदेशात, प्रकरण इतकंच होतं की पुढे गेलं होतं कोणास ठावूक" "तरी बरं बाई श्र्वेता तू बाळंतपण सगळं तुझ्या सासुच्या गळ्यात घातलंस, शिवाय वर्षभर बाळही सांभाळायला लावलंस. तेव्हढेच पैसे वाचले बेबीसिटिंगचे"यावर दोघी खिदळत बाहेर पडल्या. संतापानं लाही लाही झालेली जानू बाहेर आली. चार लोकांत मिरवणार्या श्र्वेताला बघून तिला तिडिक आली. एरवी वन्सं वन्सं करत गोड बोलणार्या श्र्वेताचा खरा चेहरा असा असेल याची तिला कल्पनाही नव्हती. कार्यक्रम संपल्यावर सगळे बसलेले असताना तिनं धनुला सांगितलं की सकाळी ती जाणार आहे आणि सोबत ममालाही घेउन जाणार आहे, हे सांगताना तिनं श्र्वेताकडे सहेतूकपणानं पहात म्हटलं की,"नाही तरी आता दुसरं मूल होईपर्यंत बेबीसिटिंगचं काम संपलेलंच आहे नाही का? शिवाय तिकडे माझ्याकडे आणि घराकडे लक्ष द्यायला आई हवीच नाही का?" माझ्याकडे आणि घराकडे यावर विशेष जोर देत तिनं श्र्वेताच्या आईकडेही जळजळीत नजरेनं पाहिलं. धनूला काहिच कल्पना नसल्यानं तो आपला म्हणत राहिला की,"पहिल्यांदाच आली आहेस तर रहा की आणखी काही दिवस. आलीस तेंव्हा तर म्हणत होतीस की निवांत राहिन म्हणून आता एकदमच काय झालं?" यावर काही न बोलता तिनं आईला बॆग भरायला सांगितली आणि अचानक आठवल्यासारखं धनुला म्हणाली की," धनू , इतके दिवस का माहित नाही पण ममा तू पाठवलेले पैसेच वापरायची, मी तिला दिलेले पैसे तिनं तिच्या कपाटात जसेच्यातसे ठेवले आहेत. पण आता तूच तिला सांग. महिन्याचा घरचा सगळा खर्च मी पाहिन आणि तिला खर्चाचे पैसे दोघेही निम्मे निम्मे देत जाऊ" आता मात्र श्र्वेता आणि तिची आई चपापल्या आणि सरळ स्वयंपाकघरातच निघून गेल्या. आईच्या मनात तिथेच रहायचं होतं पण जान्हविच्या रेट्यापुढे तिचं काही चाललं नाही आणि धनू किंवा त्याची बायकोही तिला रहा म्हणाले नाहीत तेंव्हा नाईलाजानं ती यायला तयार झाली. प्रवासात जानुनं ममाला श्र्वेता आणि तिच्या आईच्यातला संवाद जसाच्या तसा सांगितला त्यावर ममा म्हणाली,"तुझं आपलं काहीतरीच जान्हवी. चार माणसं म्हटली की चार तर्हा आल्या, त्याचा इतका बाऊ करू नये. त्या काही वेगळं बोलत असतील आणि तू आपलं अर्धं काही ऐकून डोक्यात राख घालून घेतली असशिल. धनुच्या सासुरवडिच्या लोकांना तुझ्यापेक्षा जास्त मी चांगलं ओळखते. सोन्यासारखी माणसं आहेत. तू ऊगाच नाही त्या शंका पसरवू नको" हे ऐकून जानुच्या डोक्यात तिडिकच गेली. ती ममाला म्हणाली,"तू, तुझा धनू आणि त्याची बायको, खड्ड्यात जा. मला वाईट वाटलं म्हणून बोलले. आज बोलले ते अखेरचं समज." त्या दिवसापासून जानुच्या आयुष्यातून घरगुत समस्यांना पूर्णविराम मिळाला....
जानुची गोष्ट
जानूनं दार उघडलं आणि रितूला "गुड नाईट" म्हणून निरोप दिला. रितूनं विचारलंही,"आर यू ओके बेबी?" त्यावर जानून हसत सांगितलं,"वन थाऊंजंड पर्सेंट, बा<<<य सी यू टु...मा....रो" म्हणत दार धाडकन लावून घेत ती तशीच भेलकांडत आत आली. तेव्हढ्या वेळातही बाजुच्या म्हातार्यानं दार उघडून तिच्या येण्याची दखल घेतल्याचं तिला जाणवलं आणि तोंडून कधी नव्हे ते प्रकट शिवी आली,"स्साला". कशीबशी आत येत ती बेडवर आडवी झाली आणि उलट सुलट विचारांच्या गरगरीनं झोपेच्या आधीन झाली. मनातले उलटे सुलटे विचार तिला झोपू देत नव्हते आणि मद्याचा अंमल तिला जागू देत नव्हता. अशाच भिरभिर अवस्थेत कधीतरी ती झोपून गेली. सकाळी जाग आली तेंव्हा सुलभामावशी घर आवरत होती. खरं तर तिला जाग आलीय की नाही हेच आधी समजलं नाही. तिच्या संवेदना जणू संपून गेल्या होत्या. मात्र "काफी करू का ताई?" असा सुलभामावशीचा परिचित आवाज कानावर पडला आणि खरंच जाग आलीय याची खात्री पटली. तिच्या अवताराकडे पाहून सुलभामावशी काळजिनं म्हणाल्या,"तब्येत बरी नाही का ताई?" तिला काही उत्तर न देताच जानू बाथरुममध्ये शिरली. गरम पाण्याच्या शॊवरखाली बरं वाटेल म्हणून उभी राहिली आणि उलट विचारांचा गुंता आणखिनच सुटा व्हायला लागला. सुधेंदू तर म्हणाला होता की,’एक दोन पेगनंतर यु विल बी ऒल राईट, ये गम, तकलिप सब हवा में उड जाएगा बेबी. हॆव इट’ रात्री काहीकाळ वाटलंही तसंच पण मग घरात आल्यावर पुन्हा त्याच गुंत्यात मेंदू गुरफटत गेलाच. आता अजून डोळे उघडले नाहीत तोवर परत तेच विचार आणि तेच कढ....रात्री गाडीत रितू विचारत होती,"तुला आशु गेलाय याचं वाईट वाटतंय की तो समरसारखाच गेला याचं? तू तुलना करतेयस तुझ्याच भूतकाळाची तुझ्या वर्तमानाशी. समर वॊज पास्ट आणि आशुही लवकरच तुझा पास्ट बनेल, कोणाच्या जाण्यानं कोणाचं आयुष्य थांबत नाही जान्हवी आणि ते थांबुही नाही. कोणा समर आणि आशुपुरतं आयुष्य जगायला देवानं तुला जन्माला घातलेलं नाही. जिसको जाना है बेबी वो जायेगाही तकलिफ में रहेगी तू. समरने अपनी जिंदगी ढुंढ ली आशुभी ढुंढही लेगा. तू अकेली हो जाएगी. ज्यादा सोच मत...." हे आणि असंच काही बाही रितू जानुला समजावत राहिली होती. त्यातलं काही डोक्यात शिरत होतं काही नव्हतं. सगळं पटत होतं आणि तरीही पटत नव्हतं. रात्री झोपेतही सतत आशु आणि समर आळीपाळीन दिसत राहिले. समर म्हणत होता,"कम ऒन जानू, तू एकटीच परदेशी सेटल होणार नाहीएस. तू तिकडे आलीस याचा अर्थ तू तुझी नाती तोडलीस, जबाबदार्या झटकल्यास असा होत नाही. थिंक शोनू. मी जाणार आहेच तुही बरोबर असावस असं वाटतं. आलीस तर तुझ्याबरोबर नाहीतर तुझ्याशिवाय....प्लिज जानू नाही म्हणू नको" समुनं लाख विनवण्या केल्य होत्या. पण त्यावेळेस आपल्याच डोक्यावर कसलं भूत चढलं होतं देव जाणे. भूत म्हणण्यापेक्षा जबाबदारी वाहून नेण्याची नशा चढली होती. बाबांच्यामाघारी बाबा बनून घराला सावरण्याची धुंदी. घरी येणारे जाणारे, नातेवाईक सगळेचजण नावाजत म्हणत, "जानू भक्कम आहे म्हणून बरं आहे." ते ऐकताना आणखी कणखर वाटायचं. धाकट्या भावाला, धनुला, शिकवायचं आणि त्याच्या पायावर उभं करायचं स्वप्न होतं. शिकवायचं म्हणजे खरं तर त्याचं शिक्षण शेवटच्या पायरीवर होतं. तरीही आपल्याशिवाय धनू आणि ममाला कोणी नाही ही जाणिव मनात कुठेतरी सुखीही करायची. त्याच धुंदीत तिनं समरला नकार दिला. धनुलाही भरून वगैरे आलं होतं, "यु डिझर्व्ह मच बेटर" म्हणत त्यानं धीर दिला होता. समरला नकार दिला तो दिवस जानू कधिही विसरली नाही. अखेरचा आणि निकराचा प्रयत्न करावा म्हणून समरनं तिला भेटायला बोलवलं होतं मात्र त्यावेळेस तर आणखिनच ठामपणानं नकार देउन जानू घरी आली होती. समरला ती म्हणाली होती,"मी पूर्ण विचारांती निर्णय घेतलाय समर. आता माझं पाऊल मागे ओढू नकोस" समर गेला त्या दिवशी तिला एक अनामिक रितेपणा जाणवायला लागला आणि नकळत डोळे घळघळा वहायला लागले. ममाला समजलं होतं कदाचित जानू रडतेय ते पण ती काही बोलली नाही. जानुला मनातून वाटत होतं की मामा येउन पाठीवरून हात फिरवून म्हणेल,"सगळं ठीक होईल बेटा" पण मामा खोलीत आली आणि जानुला झोपलेली पाहून दार ओढून घेउन परत गेली. त्यामुळे तिला आणखिनच तुटल्यासारखं झालं. समर गेल्यावर तो मेल करेल, फोन करेल याची तिला खात्री होती; पण प्रत्यक्षात तसं काहीच झालं नाही. जायच्या आदल्या दिवसापर्यंत तळमळणारा समर तिकडे गेल्यावर जणू हवेत विरघळून गेला. त्यानं सगळ्यांना मेल केले फोन केले पण जानुला एकही फोन कधिही केला नाही. जसं काही डायरीतलं नकोसं पान फाडावं तसं जान्हवी हे पान त्यानं काढून टाकलं असावं. हळूहळू हे शल्य जानुला बोचायला लागलं. एक दिवस बोलता बोलता ती निमाला बोललीही की समरनं तिला किमान एखादी मेल करायला हरकत नव्हती. त्यावर निमा म्हणाली,"हा निर्णय तुझाच होता जानू. समरला तू हवी होतीस तुलाच तुझा कोष तोडायचा नव्हता. आता तक्रार का करतेस? त्यानं तुझ्याशी संपर्क नाही ठेवला तरी खरं तर आता तुझं काही बिघडायला नकोय नाही का?"..................
........दिवस भराभर उलटून गेले. धनूचं शिक्षण झालंे, त्याला दिल्लीत चांगली नोकरीही मिळाली. त्यानंतर सहा आठ महिन्यातच त्यानं छान स्थळं वगैरे बघून लग्न केलं. त्याच्या लग्नाच्यावेळेस जानू म्हणालिही की,"काय गडबड आहे धनू? अजून एखाद दोन वर्षांनी लग्न नाही केलं तरी चालेल" त्यावर धनूनं तिला स्पष्ट शब्दात सांगितलं की,"मला एकटं रहायचा कंटाळा आलाय. तिकडे दिल्लीत मी एकटा असतो, माझे जेवणा खाण्याचे हाल होतात शिवाय आज काय आणि आणखी दोन वर्षांनी काय लग्न करायचंच आहे. मला तुझ्यासारखं आझाद पंछी रहायचं नाही बाबा". यावर जास्त वाद न घालता जानुनं रात्री जेवताना ममालां सांगितलं यावर कधी काही न बोलणारी ममा तिला तटकन म्हणाली,"हा ज्याच्या त्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे जान्हवी, त्यात एकमेकांनी तोंड खुपसू नये." हे वाक्य ममा ज्या पध्दतिनं बोलली त्याची धार जान्हविच्या मनाला झर्रकन कापत गेली. एक सेकंदभर तर ममा आपल्याला काही टोला हाणू पहातेय कां असंही वाटलं. एकंदर धनुचं लग्न तापदायक प्रकरणच झालं. धनू आठ दिवसांच्याच सुट्टीसाठी आला होता, तेव्हढ्यात ममानं चार चार मेरेजब्युरोत त्याचं नाव नोंदवलं. मैत्रिणिंना फोन करकरून सांगितलं. ममाची ही धांदल जानुला ठुसठुसत होती हे असं कां हे तिलाही उमगत नव्हतं आणि एक दिवस त्याचा उलगडा अगदी अचाकनपणानं तिला झाला. त्या दिवशी प्रभामावशिला मामा धनुला स्थळं बघण्याविषयी सांगत होती. प्रभामावशी ममाला म्हणाली एकदम धनुचं लग्न कसं काढलंस? जानुचं लग्न नको व्हायला? त्यावर ममा म्हणाली,"तिल नवरा बघणं माझ्या कुवतीबाहेरचं आहे. आम्ही काय बाई सामान्य माणसं." एकाएकी असा वर्मी घाव बसल्यानं जानू विचारात पडली, याचा अर्थ काय? ममाला तिनं प्रभामावशीसमोरच विचारलं तर ममा म्हण;ाली,"तुझ्या आयुष्यातले सगळेव निर्णय तुझे तू घेत आलीस जान्हवी. बाबा होते तोपर्यंत तुम्हा दोघांचं सगळं चालायचं. मला कधी विचारलंत? साधं शाळेतल्या स्पर्धेत भाग घ्यायचा झाला तरी मला विचारायची तसदिही घेतली नाही, समरशी नातं मोडलंस त्यावेळेसही आधी एका शब्दानं सांगितलं नाहीस आणि नंतरही काही बोलली नाहीस. कदाचित तू माझ्याशी असलं काही बोलावं इतकी माझी लायकी तुला वाटली नसेल." संतापानं थरथरणारी ममा मोठा श्वास घेउन थांबली. तिचं हे रूप प्रभाला नवं होतं आणि जान्हविलाही. दोघी आवाक होउन पहातच राहिल्या. ममा पुढे म्हणाली,"मी तुझी आई होते जान्हवी. पहिल्या पहिल्यांदा मलाही तुझ्यापासून तुटलं जाण्याचा त्रास व्हायचा, तुझ्यात ना माझं रूप आलं ना गुण. तू तुझ्या बाबांची डुल्पिकेट म्हणून जन्माला आलीस आणि बाकिच्यांनीही याची जाणिव मला सतत करून दिली. मी अगदी सामान्य रूपाची आणि गुणाची होते पण मी तुझी आई होते याची जाण ना इतरांनी राखली ना तू. माझ्या आयुष्यातून तुला वजा करायला मला खुप कष्ट पडले जान्हवी पण तुला तर तो त्रासही झाला नाही कारण मी तुज्या आयुष्यात कधी नव्हतेच." इतकं बोलून ममा तिच्या खोलीत निघून गेली. आज पहिल्यांदाच जान्हविला आपल्या आयुष्यात काहीतरी विसंगती होती हे जाणवलं. विचार केला तर ही वस्तुस्थिती होती. तिनं ममाचा "आई" म्हणून विचार कमीच केला होता. ममाला "ममा" म्हणायचं हे देखिल बाबानंच ठरवलं होतं. बाबा दिसायला खुपच देखणा होता, हुशार होता आणि त्याच्या घरची परिस्थिती सधन होती याऊलट आई दिसायला अगदीच सामान्य म्हणावी अशी. शिक्षण म्हणायचं तर बीएची पदवी होती पण परिक्षा दिली आणि लग्न झाल्यानं तिनं बाहेरचं जगही पाहिलं नव्हतं. पहिल्याच वर्षात जान्हवी झाली. दिवस गेले तेंव्हा बाबानं खरं तर आईला खुपच झापलं होतं. इतकी कशी वेंधळी म्हणून हिणवलं होतं. इतकंच नाही तर हे मूल नको असंही सांगितलं होतं मात्र ममानं सगळा त्रास सहन करत जानुला जन्म दिला. बाळाला बघायला अनिच्छेनं आलेला बाबा बाळाचं गोंडस रूप पाहून हरवूनच गेला. बाळ बघायला येणारा प्रत्येकजण "बाबांसारखीच गोरीपान झालीय" म्हणून कौतुक करत होता. सुरवातिला ममलाही याचं काही वाटत नव्हतं पण जानू मोठी व्हायला लागली आणि तिच्या आयुष्यातलं बाबाचं स्थान पाहून मनात कुठेतरी झुरत राहिली. धनू झाल्यावर ती सावरली. धनू दिसायला ममासारखाच झाला होता. शिक्षणातही अगदी हुश्शार नाही पण ठीकच होता. नातेवाईक, सासूबाई सतत धनू आणि जानूची तुलना करत. जानू त्या स्तुतीनं सुखावत असे तर धनू आत येउन आईला बिलगत असे. धनू अगदी ममाज बॊय होता. सुरवातिला जानुचा तिरस्कार करणारा धनू वय वाढलं तसा जानुचा चांगला मित्र बनला. म्हणजे जनुला तसं वाटत राहिलं. बाबा असेपर्यंत सगळं ठीक चाललं होतं. पण अचानकच बाबा गेला आणि घडी विस्क्टली. ती सावरायची जबाबदारी कोणी न सांगता जानुनं स्वीकारली. त्यावेळेस तिनं असंच ग्रुहित धरलं होतं की बाबा गेल्यावर ममा एकटी सगळं सांभाळुच शकणार नाही. हे घर सांभाळणं आणि चालवणं ही आता आपली जबाबदारी आहे. त्यावेळेस आपण ममावर कुरघोडी करतोय असं तिला जाणवलंही नाही आणि आज ममानं इतक्या स्पष्टपणानं सगळं बोलल्यावर तिला आजवरचं तिचं जबाबदार असणं फुकाचं वाटायला लागलं. त्या दिवसांनंतर सगळं बिनसतच गेलं......

आमचा पहिला वहिला युथ फेस्टिव्हल
आमच्या डिपार्टमेंटनं आजवर कधिही युथफेस्टिव्हलमध्ये भाग घेतला नव्हता. त्यावर्षी आमच्यातलं "टॆलेण्ट" विभागातल्या एका उत्साही सरांच्या लक्षात आलं आणि ठरलं की युथ फेस्टिव्हल मध्ये यंदा आमच्या विभागाची टिम पाठवायचीच. दुसर्या एकाउत्साही सरांनी एकांकिका लिहायचं शिवधनुष्य उचललं. कलाकारांची निवड झाली. अर्थात अस्मादिक त्यात होतेच. ऐनवेळेस सगळं ठरल्यानं खुपच घाई झाली पण आम्ही माघार घ्यायला तयार नव्हतो. होस्टेलमधून खास परवानगी मिळवून तालिमीसाठी सगळ्याचजणी जायला लागलो. रात्री दहा साडेदहा पर्यंत तालमी चालू झाल्या. इथे भ्रष्टाचार करून मेलेले आणि नंतर स्वर्गात जाऊन तिथेही हा रोग पसरवणारे राजकिय नेते आणि त्यांच्या मागोमाग स्वर्गात गेलेल्या त्यांच्या बायका असा सगळा सावळा गोंधळ कथेत होता. सगळं धमाल जमलं होतं. त्यात सगळे हौशी कलाकार असल्यानं तालमिंच्यावेळेस धमाल यायची. इतकं सगळं करून, रात्री जागल्यानं पित्त वाढवून घेउनही काही फायदा झाला नाहीच. निवडचाचणित आम्ही बाहेर फेकलो गेलो.तरीही आम्ही शस्त्रं टाकली नाहीत. त्याच कथेत फेरफार करून दुसर्या एका स्पर्धेसाठी नाव दिलं. तिथेही आम्हाला फुटाची गोळी दिली. आता तर आमच्यावरचा अन्याय दूर करण्याचा किडा जोरात चावला. त्याच कथेत फेरफार करून तिथल्यातिथे तासाभरात आम्ही पथनाट्य बसवलं आणि चाचणीसाठी उभे राहिलो. इथे चक्क आमची निवड झाली कारण दुसरं कोणी आलेलंच नव्हतं. काही का असेना, आम्ही "आत" होतो हेच आमच्यासाठी महत्वाचं होतं. आता तालमी चालू झाल्या. पूर्वीचा बाज बदलून थोडं लाऊड करताना खुपच गंमती जमती व्हायला लागल्या. संवाद बोलताना मध्येच पुर्वीचा सूर धरला जाऊ लागला. हे सगळं घोटवत बसायला वेळही नव्हता कार अवघ्या काही दिवसांवर युथफेस्टिव्हल येउन ठेपला होता. अखेरच्या दिवशी आम्हाला एक चांगली बातमी समजली की आमची एकांकिकेसाठीही निवड झालेली आहे. एकच स्क्रिप्ट आम्ही दोन ठिकाणी दोन पध्दतिंनी सादर करणार होतो. आम्ही सगळे स्मिता पाटील, नासिरूद्दीन शहा यांचे बाप असल्यानं अभिनय करायला डगमगत नव्हतो. सांगा फक्त काय करायचंय? या आवेशात होतो. कळस म्हणजे युथफेस्टिव्हलच्या दिवशीही सकाळी एका मैत्रीणीच्य घराच्य गच्चीवर आमची तालिम रंगली होती. तिच्याच घरातलं कपाट उघडून ऐनवेळेस आम्ही कपडेपट बनवत होतो. कारण आमच्याकडे साड्या वगैरे आणि मुलांकडे झब्बे असायचं काही कारणच नव्हतं. त्यातून सगळेच होस्टेलवर रहाणारे त्यामुळे उत्साहाच्याभरात कपड्यांचं काय करायचं या मुख्य मुद्द्याकडे दूर्लक्ष झालेलं होतं. मैत्रीणिच्या आई, भाऊ आणि वडिलंनी उदार मनानं त्यांची कपाटं आम्हाला उघडून दिली म्हणून बरंय नाही तर पुढार्यांच्या बायका थेट जिन्समध्ये स्वर्गात गेल्या असत्या. एकिकडे संवादांची तालिम चालली होती तर दुसरीकडे ब्लाऊज दोन इंच धरावं की तीन याचा खल चाललेला होता. ते सगळं ऐकणं खुपच मौजेचं होतं. एकिकडे भारतातल्या भ्रष्टचारावर आसूड ओढले जत होते आणि त्याचवेळेस पलिकडे लांब पायजमा जरा आखुड कसा करता येईल याबाबत चर्चा चालू होती. आमच्यामते आमची तयारी झकास झालेली होती. सगळं सामानसुमान घेउन आम्ही नाट्यगरुहात पोहोचलो. तिथे आमच्यासाठी टाळ्या वाजवायला आलेली आमची दोस्त मंडळी हजर होती ती आम्हाला पाहून युरेका युरेका करत धावत आली आणि म्हणाली होत कुठे तुम्ही? म्हटलं कां? तर त्यांनी सांगितलं की ऐनवेळेस वेळापत्रकात बदल करून एकांकिका सकाळी घेतल्या आणि संध्याकाळी पथनाट्य आहे. त्यातून आमच्या गटाची एकांकिका पहिलीच होती आणि चार पाच वेळा आमचं नाव पुकारून अखेर पुढच्या गटाला बोलविण्यात आलं होतं. आता आत शेवटची एकांकिका चालू होती. पाय गळले काय करावं सुचेना. आमच्या मित्रमंडळानं आम्हाला सगळीकडे शोधलं होतं. आम्ही मात्र रंगीत तालिम करत होतो. ते तर झालंच आणि मग लक्षात आलं की, अरे देवा! कपड्यांची तासभर केलेली टाचाटाची फुकटच गेली म्हणायची. आम्ही संयोजकांना विनंती करून पाहिली पण काही उपयोग झाला नाही. अखेर संध्याकाळच्या पथनाट्यावर लक्ष केंद्रीत केलं. एव्हाना डोक्याचा भुगा झालेला होता. काही सुधरत नव्हतं. नक्की काय करायचं हा गोंधळ झाला होता तो वेगळाच. दोन दोन गोष्टी एकाचवेळेस करायला गेल्यानं संवादांची सरमिसळ झालेली होती. आम्ही अखेर रंगमंचावर गेलोच आणि पथनाट्य म्हणून आम्हाला जे योग्य वाटलं ते सादर करून परतलो. निकाल बिकाल ऐकायचं धाडसही केलं नाही. हे सगळं झालं तरी एक गोष्ट मात्र नक्की झाली की विभागात आम्ही एक इतिहास बनविला.आमची पहिलीच बॆच होती जी युथफेस्टिव्हलमध्ये गेली. तिकडे काय झालं याला इतरांच्या लेखी फार महत्व नव्हतं. असतं तरी काय फरक पडला असता म्हणा.....:)
एक विशेष सूचना
रूममधल्या पसार्याविशयी सांगताना जरा जास्त्च लिहिलं गेलं बहुदा आणि पोस्ट करताना ब्लोगलाही जरा जास्त्च झालं असावं. त्यामुळे अखंड लेखाचे तुकडे करून पोस्ट करावे लागले :) तर प्रथ अध्यापासून पित्ताच्या गोष्टीपर्यंत सलग वाचावे.
चू.भू.दे.घे.
चू.भू.दे.घे.
रूम नं. १६ मधला "मेस" प्रथम अध्याय
......तर आमच्या रूममध्ये जवळपास अख्खं हाॅस्टेल ठिय्या मारून असायचं. याचं कारण म्हणजे, आमची रूम हाॅस्टेलमधे आल्या आल्या पहिलीच होती. डिपार्टमेंटपासून तंगडतोड करून आलेले थकलेले जीव घटकाभर टेकायला म्हणून रूममध्ये डोकावायचे. कोणी स्टडीमधून उशिरा परत यायचं आणि तोपर्यंत मेसवाली मावशी भांडी वाजवायच्या तयारीत असायची त्यामुळे भुकेले जीव पोळ्या तोडायला धाव घ्यायचे. घरातलं तूप, लोणचं चटण्यांसोबत मेसमधलं पोळी नामक रबर खायचा प्रयत्न केला जायचा. प्रत्येकीचं लोणचं तूप वेगळं. हाॅस्टेल इकडे तीन मजले आणि तिकडे चार शिवाय चार विंगमधे पसरलेलं. मग केवळ तूप लोणच्याची डबडी आणण्यासाठी इतकं चालणं जीवावर यायचं.
तिसऱ्या मजल्यावर रहाणाऱ्या पोरी त्यांच्या तुपा-लोणच्याच्या बरण्या आमच्याच खोलीत ठेवून जायचा. रोज इतकं "ओझं" उचलून आणायचे न्यायचे कष्ट वाचावेत म्हणून आमच्या "कोठी घरात" ही सगळी रसद साठवली जायची. बरं हेच नाही तर, कोणाचे इस्त्रीवाल्याला द्यायचे कपडे कोणाचे इस्त्रीचे आलेले कपडे..... असं सग्गळं पोटात आनंदानं पचवून आमची खोली खऱ्या अर्थानं नांदतं गोकूळ होती. बरं, हे सगळं आमच्या खोलीत पडू द्यायला आमचं मोठं मन हे मुख्य कारण असलं तरिह एक उपमुख्य कारणही होतं. कारण हे जे इस्त्रीचे आलेले कपडे होते ते अक्षरशः लाईफ सेव्हर होते. काय व्हायचं की, बऱ्याचदा (म्हणजे खरंतर रोजच) आंघोळीहून येईपर्यंत उशिर झालेला असायचा मग समोरच्या इस्त्रीहून आलेल्या गठ्यातून साधारण आपल्या अंगात जाईल असा ड्रेस उचलून तो चढवून धावत डिपार्टमेंट गाठायचो. गठ्ठ्यावर अडीचरूपये ठेवून जाण्याइतकं सौजन्य दाखवण्याइतक्या समंजस सगळ्याचजणी होत्या म्हणून बरंय. आमच्यात एक अलिखित करार होता, ड्रेस कोणाचा आहे बाहेर सांगायचं नाही. काही ड्रेस तर कमालिचे संशयास्पद होते. वर्गात हा ड्रेस नक्की कोणाचा आहे? यावर चर्चा व्हायची. तर ते एक असो.
संध्याकाळी जेवणं झाल्यावर अड्डा जमायचा. हातात सगळ्यांच्या पुस्तकं असायची मात्र आज कोणाच्या डिपार्टमेंटमध्ये काय झालं याचे अपडेटस दिले-घेतले जायचे. "लफड्यांचे" अपडेट घेतले जायचे. जमलेली, जमू घातलेली आणि जमून तुटलेली प्रकरणं हा तर फेव्हरीट विषय. नऊ साडेनऊला मॅडम राऊंडला यायच्या. त्यावेळेस आम्ही सगळ्या अभ्यासात बुडून गेलेल्या असायचो. मॅडम यायच्या आणि बाकिच्या सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या खोलित हकलायच्या. "ए कन्या, चल आता रूमवर पळ, मी आईचा फोन आला तर सांगेन हं नुसती नाटकं चाललीत अभ्यसाची" असं अनुनासिक स्वरात त्या सांगायच्या तेंव्हा आम्ही घाबरल्याचं नाटक मस्त वठवायचो. सगळ्याजणी आपापल्या खोलीत गेल्यासारखं करायच्या. पुढच्या खोल्यांपुढून जाताना मॅडम नुसत्याच, रूम १५,रूम११,रूम१०नअशी आरोळी द्यायच्या की आतून पोरी आहे मॅडम असं सांगायच्या.
आता कळतंय, पोरींना वाटायचं भोसलेमॅडमला गंडवलं पण खरंतर मॅडमलाही हे माहितच असणार पण ती गंडवलं गेल्याचं नाटक छान वठवायची. चार घरच्या चार पोरी कुटुंबापासून लांब केवळ शिकायला आल्यात तर राहू देत एकमेकीला धरून हे कळण्याइतकी क्यूट होती आमची भोसलेमॅडम. (छायाचित्र सौ. गुगल)
.

रूम नं १६ मधला "मेस" भाग २
........
जुनं आणि नवं अशा दोन इमारतींमध्ये हाॅस्टेल विभागलं होतं. आम्ही जुन्या इमारतीत रहायचो. या दोन इमारतिंना फरशा घातलेल्या पायवाटेनं जोडलं होतं. मॅडमची रूम नव्या इमारतीत होती. रात्रीचा राउंड झाला की, दोन्ही इमारतींच्या मुख्य दरांना कुलुपं लावली जायची. चूकून तिकडची मुलगी इकडे किंवा इकडची तिकडे गेलेली असेल आणि मॅडम आलेली समजलं नसेल तर हमखास अडकून पडायला व्हायचं. किंवा कधी कधी मुद्दामच अडकून राहिल्याचं नाटक व्हायचं. आमच्या खोलीत अडकणारयांची संख्या लक्षणीय होती आणि दिवसेंदिवस त्यात भरच पडत होती. त्यातून आम्ही पडलो हुश्शार मुली. मॅडमच्या हातात सापडायला तयार नाही.
पण हर कुत्ते का दिन आता ही है! एक दिवस मॅडम लवकर गेल्या, आम्ही मस्त ट्रॅन्झिस्टर लावून क्रिकेटची काॅमेंट्री ऐकत होतो. सचिन मस्त फाॅर्ममध्ये होता .मॅडम गेल्या असं वाटल्यानं गाफिल होतो, अंगावर पांघरूणं घेउन रेडिओ ऐकत होतो, जवळपास पुस्तकं वगैरे काही नाही आणि अचानकच दार टकटक वाजलं, एका पारूनं उठून बिनधास्त दार उघडलं तर बाहेर साक्षात अटीवर हात ठेवून मॅडम उभ्या. झाली का पंचाईत!
ही त्यांना आत घ्यायला तयार नाही, दारातून फुटाची गोळी द्यायच्या प्रयत्नात आणि आत आम्ही ट्रान्झिस्टर बंद करण्यासाठी पांघरूणाच्या आतून चाचपडत होतो, सगळ्यांनी एकदमच हालचाल केल्यानं तो एव्हढासा ट्रॅन्झिस्टर पांघरुणांच्या आणि उशांच्या ढिगाऱ्यात गायब तर झालाच पण इतका वेळ हळू आवाजात चाललेली काॅमेंट्री कोणाचा तरी हात बटनाला लागल्याने मोठ्या आवाजात ऐकायाला यायला लागली. आता आम्हाला हॅण्डसअप करण्यावाचून पर्यायच राहिला नाही. मॅडम आत आल्या आणि त्यांनी आम्हाला उठून उभं रहायला सांगितलं, आम्ही धडपडत कशाबशा कोणी काॅटवर तर कोणी खाली अशा उभ्या राहिलो. त्याबरोबर काॅटवरची पांघरूणं अर्धी खाली, अर्धी वर अशी लटकायला लागली. मॅडम म्हणाल्या इथे आत्ता रेडिओचा आवाज येत होता, कुठे आहे तो? पटकन द्या नाहीतर मी रेक्टरना सांगेन. आम्ही सगळ्याजणी जिवाच्या अकांतानं काॅट चाचपडायला लागलो रेडिओ सापडेना. मग मॅडम जातीनं शोधकार्यात सहभागी होण्यासाठी सरसावल्या तर त्यांचं पहिलं पाऊल आंघोळिच्या मगात अडकलं(एका पारूचा हा मग होता. तो मग म्हणजे एक छोटी बादलीच होती), त्यातून सावरत पुढे आल्या आणि मगातून पाय काढताना आधार म्हणून दारातल्या फडताळाला पकडलं तर कसा कोण जाणे धक्का लागून लोणच्याचा बाटला खाली पडला. त्याच्याकडे बघताना त्यांना खालच्या कप्यात ठेवलेली घासायची भांडी आणि धुवायच्या कपड्यांचा ढीग दिसला. तिथून अबाऊट टर्न मारेपर्यंत मॅडम ट्रॅन्झिस्टर आणि काॅमेंट्री साफ विसरल्या होत्या. आता त्यांनीच काॅमेंट्री द्यायला सुरवात केली. अगं अगं काय गं हे?मुली नां तुम्ही? उद्या संसाराला लागाल तर अशा रहाणार का? वेळच्यावेळी भांडी घासत जा, कपडे धुवत जा. आणि या इतक्या बाटल्या इथे का ठेवल्यात? अख्ख्या हाॅस्टेलच्या तुपाच्या आणि लोणच्याच्या बरण्या कशाला गोळा करून ठेवल्यात? (ही एक वेगळीच भानगड होती) अगं रूम आहे की कचरा कोंडाळं? रहावतं कसं तुम्हाला? अस म्हणत कशा बशा त्या टेबलपर्यंत पोहोचल्या. आता त्यांना बसा म्हणायचं तर खोलितल्या एकुलत्या एका खुर्चीवर असणाऱ्या फाईलचा ढीग, पुस्तकांचा गठ्ठा आणि ओढण्या, स्कार्फ, रूमाल सलवारी या सगळ्यांच्या प्रेमालाप दूर करणं भाग होतं. सवयीनं नेमकं एकीनं जे नको करायला तेच केलं. तिनं गुड गर्ल बनायच्या नादात खुर्चीवरचा सगळा ढीग उचलून पटकन काॅटच्या कोपऱ्यात फेकला. थंड होत आलेल्या मॅडम पुन्हा बरसो बरसो रे मेघा करत कडाडायला लागल्या. त्यांनी आता कामालाच लावलं. सगळे कपडे घडी घालायला लावले. ते हॅन्गरला लावायला लावले. पुस्तकं जिथल्या तिथे गेली, खोली झाडून साफ झाली. हे सगळं होत असताना तिकडे बिचाऱ्या सचिनची विकेट पडून आपल्या टिमची गळती चालू झाली होती. रेडिओ चालूच होता . आता मॅडमच्या लक्षााात आलं की, त्या कशासाठी आत आल्या होत्या. त्यांनी खबदाडात पडलेला रेडिओ उचलून तो बंद केला. मला म्हणाल्या कोणाचा आहे गं कन्ये हा? मी म्हटलं काय की. आमच्या रूममध्ये होता कोणीतरी ठेवलेला.
मॅडम- असा कसा ठेवला? नियम माहित नाहीत? रेडिओ लावायचा नसतो. आता रेक्टरनी मला विचारलं तर काय सांगू? इतक्यात एव्हढ्या थंडीतही एका पारूची दिमाग की बत्ती पेटली. तिनं घाई घाईत सांगितलं, मॅडम कोणाला माहित नाही पण ,दुपारी मीच हा गावातल्या काकांकडून आणला होता. आम्ही या शहिद व्हायला निघालेल्या भीडूकडे साश्रु नयनांनी बघतच राहिलो. पण तिनं हुशारीला जगात आम्ही कोणी तोंड उघडून माती खाण्यापूर्वी लगबगीत सांगितलं की, "मॅडम आम्हाला क्रिडाच्या बातम्या कव्हर करायला सांगितल्या आहेत. आता आम्ही कुठे जाणार? म्हणून आज अनायचे मॅच होती तर सर म्हणाले रेडिओ ऐका आणि उद्या न्युज आयटम बनवा." अक्षरश: भरून आलं तिच्या हुशारीमुळे. आम्ही हो त हो मिसळण्यात माहिर होतोच. मॅडमची समजूत कशी बशी काढली खरी पण एक धडा मिळाला, अन्ना, चोबीस घंटा चोकन्ना रेहेने का! (छायाचित्र सौ. गुगल)

रूम नं. १६ मधला "मेस" : काॅमेण्ट्रीचा शेवट
मॅडमचाही बिचारीचा जीव होता आमच्यावर, तिलाही पटलं. त्या म्हणाल्या,"काय तरीच बाई तुमच्या डिपार्टमेंटचा जगावेगळा अभ्यास. फार डोकं चालवावं लागतं नाही? इतर कन्या पुस्तकातून बघून अभ्यास करता पण तुमचं तसं नाही. अगं पण आधी माझी आपली नाॅमिनल परवानगी घ्यायची नाही का? समजा आत्ता माझ्याऐवजी रेक्टर मॅडम आल्या असत्या आणि त्यांनी तुम्हाला विचारलं असतं की मला माहित आहे का म्हणून तर?" आम्ही साळसूदपणानं म्हणालो,"साॅरी मॅडम. आम्हाला माहितच नव्हतं की ,अशी परवानगी घ्यायची असते. इथून पुढे असं नाही होणार" तेव्हढ्यात संधी साधून एकजण म्हणालीच की "मॅडम आम्हाला गरज पडली तर आम्ही ट्रॅन्झिस्टर आणू शकतो ना?" मॅडम म्हणाल्या"आणा, पण उगाच सगळ्याजणींना जमवून बसू नका आणि आवाज तुमच्यापुरता ठेवा" सगळ सेटल झालंय असं वाटत असतानाच मॅडमचं मागे लक्ष गेलं, त्या ओरडल्या "काय गं चंदे तू यांच्या रूममध्ये काय करतेयस?" चंदा म्हणाली,"मी कुठे काय करतेय? तुमचा आवाज आला म्हणून आत आले." मॅडम कडाडल्या"माझा आवज ऐकून आत कशाला यायला हवंय? इथे काय चाललंय?पळ इथून" चंदा साळसूदपणानं म्हणाली,"मी इथेच नाही सगळीकडे जाऊन तुम्हाला शोधून आले. माझं गजराचं घड्याळ बंद पडलंय आणि रूमपार्टनर नाहीए, उद्या मला पहाटे उठायचंय. तुमच्याशिवाय दुसरं कोणी उठवेल यावर माझा विश्वास नाही. म्हणून ते सांगायला तुम्हाला शोधत होते. इथे तुम्ही पेटला होता. मध्ये बोलले असते तर माझ्यावरच रागवला असता म्हणून तुमचं संपायची वाट बघत होते." मॅडमला अर्थातच गहिवरून आलं. चंदाची सुटका झाली. तिच्यामागे असणारी "सू" दिसली तिच्यावर मॅडम खेकसल्या "तू गं कन्ये? तुझा काय निरोप?" बावरलेली सुवर्णा गप्पच उभी राहिली. तिच्या मदतिला आम्ही धावलो,"मॅडम सू ला आम्ही बोलवलं, तिला हे खेळाबिळातलं टेक्निकल समजतं नां? आम्हाला इतकं डिटेलमध्ये समजत नाही. बिचारीला आज लवकर झोपायचं होतं पण आमच्यासाठी बसलीय डोळे उघडे ठेवून" मॅडमला पुन्हा एकदा गहिवर आला. असं एक एक करत काहींना लटकावं लागलं
तर काही जणी सलामत शिरानिशी आपापल्या रूममध्ये गेल्या. जाताना मॅडम धमकी द्यायला विसरल्या नाहीत की ,उद्या जर खालच्या कप्यातला कपड्यांचा आणि भांड्यांचा ढीग स्वच्छ झाला नाही तर.....?असो. दुसऱ्या दिवशी आम्ही दुपारी लवकर येउन हे सत्कार्य उरकून टाकलं. जाऊदे आज काय आणि दोन दिवसांनी काय, कपडे धुवावे लागणारच होते नां!
..................

Subscribe to:
Posts (Atom)