गुगलणारी माणसं
माणसं काय गोष्टींसाठी "गुगलतील" याचा नेम नाही. मनात जरा शंका आली की गुगल्याच्या खिडकीत टायपायचं आणि शंका निरसन करायचं येड बर्याचजणां लागलं आहे. माझा ब्लॊग सर्च इंजिनमधून सापडलेल्या महाभागांनी काय काय शोधलंय हे पाहिलं आणि त्याचे रिझल्ट पाहोले की थक्कच व्हायला होतं. कोणीतरी "निवारा" बद्दल काही शोधत होतं तर माझ्या कवितेतल्या एका शब्दामुळे तो दिसत होताच पण त्याच्या जोडीला कुठल्यातरी गावातला "बस निवारा" कोसळला असं सांगणारं संकेतस्थळही दिसत होतं. मला नेहमी अशी मिसळ पाहिली की जाम उत्सुकता वाटत रहाते की ज्यांनं कोणी यासाठी सर्च टाकला असेल तो नक्की काय शोधत असेल? मागे एकदा मराठीतून कोणीतरी "तसल्या" संकेतस्थळाचा शोध घेत इथंपर्यंत पोहोचलं होतं. हाईट म्हणजे मी जी फ़सलेल्या गुलाबाजामाची पोस्ट टाकली होती तीसुध्दा अशीच कोणालातरी गुगलताना मिळाली असावी बहुदा कारण गुलाबजाम या शब्दाच्या संदर्भात येणारे सगळे रिझल्ट तिथे दिसत होते. मिनिटभर मला कल्पनेनच हसायला आलं की कोणितरी बिचारं गुलाबजाम कसे करावेत हे शोधत असेल आणि त्याला माझे फ़सलेले गुलाबजाम सापडावेत यासारखा भयंकर योगायोग नाही. रूम नं १६ च्या पोस्टच्या सोबतिला सर्चमध्ये स्वीट सिस्क्टिनही मौजुद होत्या. कोणीतरी "ममा" शोधत इकडे वाट चुकलं होतं. म्हणजे ना काही समजतच नाही की लोक नक्की काय बरं शोधत असतील? कधी कधी तर सर्चमध्ये ब्लॊग पाहिला तरी समजतच नाही की नक्की कोणत्या शब्दामुळे हा इथे आलाय? म्हणजे मुळात हा शब्द आपण वापरलाय हेच वसरायला होतं. जगभरातून माणसं काही बाही शोधत ब्लॊगवर भरकटलेली माणसं पाहिली की गंमतच वाटते. हे म्हणजे कसं वाटतं नां की,बनियन शोधायला जावं तर साडी हातात येते आणि मोजा शोधावा तर टोपी सापडते. कशाचा कशाला संबंधच नाही.
Subscribe to:
Post Comments (Atom)
8 comments:
मला पण मजा येते हे बघायला....माझ्या ब्लॉगसाठीचे नेहेमीचे विषय म्हणजे...नवरा , बायको, आई, दुबई, शाळा,...........
मस्त आहे पोस्ट
tanvi
(माझे नाव सहजच लिहू नकोस आता)
@ sahajach ????
thanku
बनियन शोधायला जावं तर साडी हातात येते आणि मोजा शोधावा तर टोपी सापडते.
ha ha ha....
kaalach ghar movers ni rikama keley kahihi shodhala tar kahich haataat yet nahi asahi chalaly...:)
छान आहे. गुगलताना एक शोधताना तिसरंच काहीतरी मिळतं हे खरं आहे. पण कधी कधी आपल्याला जे शोधायचंय, त्यासाठी नेमका शब्द सापडत नाही पण सुरूवातीचे दोन शब्द टाईप केले की तिसरा शब्द आधीच कुणीतरी केलेल्या शोधामुळे पटकन मिळून जातो, हा एक फादा मात्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज असं गुगलत रोज किमान दहा जण माझ्या ब्लॉगवर येतात. पण कोणत्या शब्दामुळे काय सापडेल याचा नेम नसतो. मजा आली लेख वाचताना.
@ अपर्णा
ha ha haघर बदलल्यानंतर नेहमिच्याच वस्तू परत शोधणं हे एक अत्यंत डोकेबाज काम आहे आणि अशा डोकेबाज कामासाठी शुभेच्छा!
ता.क.-कसं करायचं माहितिय का, म्हणजे समज साडी शोधत असताना चुकून बनियन सापडलाच तर तो नवर्याला द्यायचा आणि म्हणायचं आता सापडलाच आहे बदलून घे. ऊगाच मेहनत वाया जायला नको नाही का?
@ कांचन कराई
धन्यवाद. तुमच्या प्रतिक्रीया माझा उत्साह वाढवतात.
:) शिवाजी महाराज शोधत तुझ्या ब्लॊगवर का बरं येतात ही भटकी?
guys you are amazing. never thought women could be so interesting to spend time on actually reading the post. but i admit, i liked it n you are great
@ vaibhaw
अष्टावधानी बायका? :p
धन्यवाद.
Post a Comment