अडकलेली पिन

आज सकाळपासून म्हणजे, डोळे उघडल्याबरोबर बेडवरून उतरताना मनात "मन तळ्यात मळ्यात, जाईच्या कळ्यात" या गाण्याची ओळ आली. सकाळपासून नेहमिची कामं उरकताना गळ्यातून सतत त्या ओळी "वहात" आहेत. आता तुम्ही म्हणाल की, मग यात प्राॅब्लेम काय आहे? प्राॅब्लेम आत्ताचा नाही बराच जुना आहे, अगदी "क्रोनिक" म्हणण्यासारखा. म्हणजे काय आहे नां की, जवळपास रोजच दिवसभराच्या कोणत्यातरी प्रहरात एखादी ओळ ऐकली जाते मग ती मनात घुसते आणि ओठांवर सतत येत रहाते. पुन्हा संकट हे की, गाणं अख्खं माहितच नसतं, मग दिवसभर सतत तीच ओळ गुणगुणत राहिल्यानं आजुबाजुच्या सगळ्यांना वात येईपर्यंत ती ऐकावी लागते (तसे सगळे सहनशिल आहेत म्हणा). पण होतं काय की ,गुणगुणताना तंद्रीत असतानाच मधेच भलतेच शब्द बाहेर पडतात. आज किमान पन्नासएक वेळा तरी मी जाईच्या ऐवजी "गाईच्या" म्हटलं असेल 😂 बरंय म्हणा सध्या घरात पार्सल क्रमांक दोन शिवाय कोणी नसतं. त्याला त्याचंच बोललेलं समजत नाही तर माझं कुठून समजणार ? म्हणून तर गाई, वासरं, म्हशी, शेळ्या सगळं खपतंय. सानू मात्र तंद्री भंग करून म्हणाली असती,"अगं आई मघाशी तर जाई म्हणालिस आणि आता गाई कसं? हे राॅन्ग आहे", असो. मला तर कधी कधी शंकाच येते की, गळ्यात गाण्याच्या पिना अडकण्याचा कसला रोग बिग तर नाही नां मला? काॅलेजमधे असताना आमच्या ग्रुपमधल्या मैत्रिणी (लाडानं, कौतुकानं की भोचकपणानं कोण जाणे) मला गॅरंटी संपलेला ग्रामोफ़ोन म्हणायच्या. होतं काय नां की ,कामाला हात जुंपले की आपोआप प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे तोंड चालू होतं. मग त्यातून कोणत्या गाण्याचं पीठ पक्षी पिट्ट्या पडेल काही सांगता येत नाही. लावणी, भारूड, पाॅप, भक्तीसंगीत, बालसंगीत अशा कोणत्याही प्रकारातलं मऊसूत पीठ भरभरा येत रहातं.
मागे एकदा घर आवरायला काढलं होत तर तोंडात सतत "जिवलगा राहिले रे दूर घर माझे, पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे"च येत होतं. साधारण तासभर या दोनच ओळींच रिबिट कानाला बसल्यावर आमच्या "वैनीसाहेब" वैतागल्या आणि म्हणाल्या,"फ़ारच जड झालं असेल तर ठेव ते बोचकं बाजुला आणि आता माझे बये एकतर अख्खं गाणं म्हण नाहीतर गाण्याची सीडी तरी बदल". मला बिचारीला माहितच नव्हतं की मी फ़क्त एक तास दोनच ओळी म्हणत होते. 😜बरं, गाणं म्हणण्याची एखाद्या माणसाला हौस असावी म्हणजे किती? आवडली चाल की म्हण गाणं . असा सपाटा असल्यानं मी अजाणता अनेक तरल गाण्यांच्याही कत्तली केल्या आहेत. हे अर्थात कोणीतरी सांगितल्यावरच समजलं म्हणा. १९४२ मधलं रिमझिम  रूमझुम गाणं त्यावेळेस नुकतंच कानावर पडायला सुरवात झालेली होती. आता साधारण त्यावेळेपर्यंत पावसातलं नवं गाणं म्हणजे "फ़डकतं" असा समज पक्का झालेला होता. मग शब्दही तसेच ढींगचॅक असायचे. आता आम्हाला हे गाणं म्हणायची हौस फ़ुटली म्हटल्यावर शब्दांची वाट लागणार हे ओघानं आलंच. मी बजता है जलतरंग टीन के छ्त पे....च्या ऐवजी अक्षरश: जलता है ये बदन वगैरे सारखे भयानक शब्द पेरून वाट लावली गाण्याची. तरी बरं दोनच वेळा मी म्हटलं आणि सख्ख्या मैत्रिणीच्या ते ताबडतोब लक्षात येऊन तिनं मला सावरलं.
एकदा तर भर दुपारी ऑफ़िसमध्ये सगळेजण आपापल्या कामात  गुंग असताना मला जोरात "कुण्या गावाचं आलं पाखरू" म्हणायच्या कळा यायला लागल्या होत्या. मग मनातल्या मनात वरच्या पट्टीतला सूर लावून मनातल्या मनात गाणं म्हटलं, तरी हातांनी आणि मानेनं दगा दिलाच. टेबलवर बोटांनी ठेका धरला आणि मान तालात हलायला लागल्यावर आजुबाजुच्यांनी "बरंय नां सगळा?" असा लूक दिला, हे सांगणे न लगे. या सगळ्यातून जर काही चांगलं झालंच असेल तर ते म्हणजे माझे सूर पक्के वगैरे झालेत.
तर हे सगळं आठवायचं तत्कालिन कारण म्हणजे मागच्या रविवारी दिवसभर "मन शुध्द तुझं....तू चाल पुढं तुला गड्या भिती कुनाची, पर्वा भी कुनाची" वर पिन अडकली होती. आता रविवारी दिवसभर हे गाणं किंवा या दोनच ओळी कोणी म्हणायला लागलं तर काय होईल? (घाबरु नका, गडावर तशी शांतता आहे😛) तर जरा बारिक सीन झाला आणि नवरा वैतागला. त्यानं कट्टी केली. कसंबसं मान्य केलं की, होय बाबा तू बरोबर मी चूक. आता परत एकच गाणं दिवसभरात अज्जिबात गुणगुणायचं नाही असा पणही  केला. पण हे केल्याला अवघे अठ्ठेचाळीस तास उलटले नाहीत तर आज मन तळ्यात मळ्यात करत दिवसभर अडकून राहिलंय. देवा... माझं काहीच बरं होणार नाहीए का?
 

14 comments:

भानस said...

shinu तुझी आजची अडकलेली पिन इथे ऐक गं..:) http://www.youtube.com/watch?v=69kGINLw_bI
खरेच असे गाणे रुतून बसले की दिवसभर तेच...माझेही असेच होते. प्रकटन आवडले.बाकी ते जीवलगाचे बोचके एकदम मस्तच....:)

शिनु said...

@ bhanas

thanku. mhanaje maazyasarakhac rog tulaahi aahe ki :) same pinch :)

Anonymous said...

hahah mast aahe lekh me pan bare ch vela ganya chi kattal keli aahe

meg said...

aga... bara nahi... he chaangla lakshan aahe..! hech creative mind asnyacha chinha aahe! aani ase rogi (?) saglikade pasarlet tyamule chinta nasavi!!

good one!

अपर्णा said...

अगं आपण सगळ्या एकाच रोगाच्या बळी...मला तर कधी कधी कुणाच्या तोंडुन एखादं गाणं दिवसाच्या सुरुवातीला ऐकलं की आवडत असो वा नसो दिवसभर तेच असंही होतं....छानच झालीय पोस्ट

शिनु said...

@ mrgh

:) thanku.

शिनु said...

@ aparna

mazyasarakhe barech rogi asalyache wachun aanad zala :)

शिनु said...

@ anamikji


Jay ho :)

Anonymous said...

शिनू पुन्हा एकदा सेम पिंच....अजून काय बोलु...एक महत्वाचे सानूला पण इशानकडून सेम पिंच सांग...माझ्या उगाचच उडणाऱ्या फुग्याला तो पण अश्याच ’पिना’ मारत असतो...मी तर त्याला विचारलय आईवर इतके लक्ष ठेवतोस तसे बायकोवर ठेवणार आहेस का?
Tanvi

शिनु said...

@ tanvi

:)मी तर त्याला विचारलय आईवर इतके लक्ष ठेवतोस तसे बायकोवर ठेवणार आहेस का? :P मला असं विचारयचीसुध्दा सोय नाही.

Anonymous said...

मलादेखील एकदा लाय लाय पोरी लायेकरणी वाकड्या शेड्याच्या गोवेकरणी हे गाणे लाय लाय पोरी लायेकरणी वाकड्या तोंडाच्या गोवेकरणी असे म्हटल्याने आमच्या गोवेकरणीचा रोष पत्करावा लागला होता

शिनु said...

@ ano

लाय लाय पोरी लायेकरणी वाकड्या तोंडाच्या गोवेकरणी haa ha ha ha

हे सही आहे.

Unknown said...

बगुनानालाही हीच सवय आहे.पण स्वयमपि गायम, स्वयमपि ऐकम इतपतच आवाज असतो.
पुर्वी मोठ्याने असायचं. एकदा गोड गोजिरी लाज लाजरी आई तु होणार नवरी गुणगुणल्यावर लय म्हणजे लयच ओरडा खाल्लेला

Unknown said...

बगुनानालाही हीच सवय आहे.पण स्वयमपि गायम, स्वयमपि ऐकम इतपतच आवाज असतो.
पुर्वी मोठ्याने असायचं. एकदा गोड गोजिरी लाज लाजरी आई तु होणार नवरी गुणगुणल्यावर लय म्हणजे लयच ओरडा खाल्लेला