दिवस असे की......
हॆलो.....हॆलो.....डॊक्टर......ऎडमिट होऊ? लगेच......हॆलो....हॆलो....आई मी ऎडमिट होतेय, तू हॊस्पिटलमध्ये पोहोच.....हॆलो.....(फ़ोन १,२,३,४,५,६).......आय थिंक आता वाट बघण्यात अर्थ नाही, वी मस्ट गो फ़ॊर सीझेरीयन......टिक, टिक, टिक, टिक, टिक.......अभिनंदन , मुलगा झाला.....अभिनंदन......वेलकम बॆक होम.....वेळ:पहाटेचे चार- ट्यॆंहॆं...शू केली वाटतं बदला लंगोट, वेळ:४.०५ मिनिटं पुन्हा शू, ४.२०- शी, ४.२१ भूक, ४.५० शी, परत शू परत भूक....... सकाळचा प्रहर....परत तेच.....दुपारचा प्रहर...पुन्हा तेच....संध्याकाळ...तेच....रात्र....तेच.....मध्यरात्र.....तेच....दिवस एक.....दिवस दोन... दिवस तीन...किती दिवस झाले कोणास ठा्वूक रूटिन मात्र तेच.....काक्वा, मावश्या, आत्या, अनुभवी मित्रमंडळी....अगं सुरवातीचे थोडे दिवस असंच असतं, मग हळू हळू सेटल होईल.......कितवा दिवस माहित नाही, रूटिनमध्ये बदल इतकाच की आता झोपलेला नसेल तर खेळत असतो, वेळ: रात्रीचे २.३०, ३.३०, ३.१५, पहाटेचे चार म्हणजे कोणतिही....पहिल्यांदा उत्साहानं सोबत जागणारी मंडळी आता हळू हळू पळ काढतायत.....करंट स्टेटस:अकेले हम अकेले तुम....
Subscribe to:
Post Comments (Atom)
4 comments:
मला अगदी माझे दिवस आठवले... आता मा लेक दिड वर्षाची आहे. पण सुरुवातिचे 3 महिने दिवसा झोप आणि रात्री जागरण... अगदी वैताग आला होता... पण आई काकवा मावश्या सांगतात ते खरच आहे... ही एक पासिंग फेज आहे... लवकरच तुम्हाला रात्री ची झोप मिळायला लागेल. :)
:)
माझी भाची माझ्याकडे बालान्तिनीला आली. तिला तुमचा ब्लॉग दाखविला.....तिलाही टेंशन आल म्हणते?
@ DT
:D
तिला म्हणावं. टेन्शन कायको लेने का?
नंतर सगळं व्यवस्थित होतं.
Post a Comment