tag:blogger.com,1999:blog-4054357377414333792.post1793644504779381220..comments2023-05-21T14:57:56.620+05:30Comments on आठवणींचे पिंपळपान : अस्वस्थ मी : नशा कशाची?शिनुhttp://www.blogger.com/profile/15679173236293000359noreply@blogger.comBlogger9125tag:blogger.com,1999:blog-4054357377414333792.post-25536445776749697582016-07-06T12:17:28.917+05:302016-07-06T12:17:28.917+05:30पुन्हा एकदा प्रतिक्रियेसहित स्वागत.
हा पहिला भाग ...पुन्हा एकदा प्रतिक्रियेसहित स्वागत.

हा पहिला भाग आधी आलाच नव्हता त्यामुळे तो झळकला नाही. असो देर आए दुरूस्त आए.

प्रत्येकाचं एखाद्या गोष्टीवरचं मत हे आजुबाजूला घडणाऱ्या घटनांवरून बनत असतं. हे नैसर्गिक आहे. ज्याचा जसा अनुभव त्याचं तसं मत.

दारू पिणं हा काळजीचा विषय असण्यापेक्षाही लहान वयातली मुलं दारू पिऊन गाड्या चालवतात आणि मग बहुतेकवेळा जे होतं ते आहे. हा तत्कालीन संदर्भ आहे.

आपली मुलं आपण सुजाणपणे वाढवूच पण आजूबाजूला जे चित्र सर्रास दिसतंय ते नजरेआड करता येत नाही ही खरी कोंडी.
वाॅटरपार्कमधे 10-12 वर्षाचा मुलगा झिंगून अर्वाच्य वागताना पाहिला की होतो त्रास.
अगदी आपल्या परिचयातल्या व्यक्तीचा नववी दहावीला असलेला मुलगा बेदरकार गाडी चालवत अपघात करतो हे समजल्यावर होतो त्रास

असो. भान आणि जबाबदारी हे संस्कारांसोबत दिले पाहिजेत यावर मी ठाम आहेशिनुhttps://www.blogger.com/profile/15679173236293000359noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4054357377414333792.post-52211031386716804592016-07-06T11:46:13.314+05:302016-07-06T11:46:13.314+05:30अस्वस्थ?... पण का?
ब्लाॅग लिहीणं किंवा त्यावर प्र...अस्वस्थ?... पण का?

ब्लाॅग लिहीणं किंवा त्यावर प्रतिक्रिया देणं हा माझा पहिलाच प्रयत्न. एक नेटीझन च्या जन्मसिद्ध अधिकाराने मी माझे मत प्रकट करीत आहे. वास्तविक प्रत्येक सुजाण भारतीय नागरिकाचा हा स्वभाव गुणधर्म असणं गरजेचंच आहे. संबंध असो वा नसो, दे मत! गरज असो वा नसो, उघड तोंड! बुद्धीचे पैलू उघडे केले ना की चार भाट त्यावर पंचारती करायला सिद्धच असतात. मुग गिळून गप्प बसलं ना की लोक "आऊट डेटेड" म्हणतील अशी अनामिक भीती असते. पुलं नी हे वर्णन पुणेकरांसाठी केलं होतं पण मी तेच सर्व माझ्यासह भारतीयांना लावतो. मग ते कुठेही जन्माला येवोत वा कुठेही स्थित असोत.

एकंदरीत लेखाचा आशय हा कोणासही सहज पटण्यासारखा आणि पटकन स्विकार करण्यासारखाच आहे. जो विरोध करेल किंवा नाराजी व्यक्त करेल तो एक पुणेकरच. विषयाची मांडळी सुद्धा मुद्देसूद व भावूक पद्धतीने; त्यामुळे वाचकांच्या हृदयाला हात घातला नाही तर नवलच! हा लेख जर निबंध स्पर्धेत गेला तर चांगले गुण मिळवल्या शिवाय राहणार नाही.

माझे व्यक्तिगत मत विचाराल (माहीती आहे, कोणीही विचारलेले नाही.) तर थोडे भिन्न आहे. दारू, मद्य, समाज, संस्कृतीची ऱ्हास आणि भविष्यावर त्याचा होणारा परिणाम या सर्व बाबी ज्या पद्धतीनं मांडल्या गेल्यात ते तितकसं मला तरी पटलेलं नाही. मी स्वत: मद्यपान न करणारा तसेच मांसाहार न करणारा असलो तरी जे करतात ते वाईट किंवा संस्कृतीहीन असा विचार करणं योग्य नाही. जरी काही वर्षां पुर्वी माझेही बहुतांशी विचार लेखिके सारखेच होते तरी कालानुरूप मत बदलले आहे.

ज्या बातमी संदर्भात लेख आहे त्याची मला सुतराम कल्पना नाही. पण एकंदरीत असं वाटतं, विषयाला फारच गंभीर स्वरूप दिलं गेलंय. एका घटनेवरून समस्त समाज अराजकते मधे जात नाही. काहीतरी आणि कधीतरी गोष्टी घडत राहणारच. जशा वाईट घटना घडतात तशा चांगल्या सुद्धा घडतात. या इंटरनेट, टिव्ही च्या माध्यमातून सर्व जग जवळ आलंय, त्यामुळं या घटना अंगावर येणाऱ्या भासतात. पण तसं वाटून घ्यायचं नाही. जो पर्यंत आपली सदसद विवेक बुद्धी जागृत आहे तो पर्यंत कोणतेच भय बाळगण्याची गरज नाही. जर आपण आपल्या पुढच्या पिढीला व्यसनाधिनता काय असते आणि त्याच्या अतिरेकाचे दुष्परिणाम काय असतात हे समजावू शकलो तर भीती उरणारच नाही. माहीती आहे की हे इतकं सोपं नाही. बाहेर जगात खुणावणाऱ्या व भुलवणाऱ्या गोष्टी खुप आहेत. ज्या त्याना सहज पथ भ्रष्ट करू शकतात. तरी आपण सर्वतो प्रयत्न करीत राहणे हाच उपाय आहे. नुसतंच अस्वस्थ होऊन काय साध्य होणार आहे.

मद्यपानाने अख्खी पिढी वाया जाण्याची शक्यता अजिबात नाही. अजूनही सुजाण पालक बरेच आहेत जे स्वत: पित असले वा नसले तरी मुलाना योग्य गोष्ट योग्य वयात करण्याचं ज्ञान देत असतात. जर आपण तसे करीत नसाल तर तसे करणे जरूरीचे आहे. जसे आपण लहान मुलाला गॅस व लाइटर पासून दूर ठेवतो तसेच मदिरेचे पण आहे. उगाच त्याचे उदात्तीकरण करून कोणी वाॅटर बाॅटल मधे बीयर का देत नाही असं विचारणं चुकीचे ठरेल.

लिमीट मधे पिणाऱ्यांचे समर्थन नव्हे पण त्यांचा मुद्दा असा की ते क्वचित प्रसंगी जरी पित असले तरी ते त्या द्रव्याच्या अधिन जाऊन स्वत:वरील नियंत्रण घालवत नाहीत. मित्र किंवा सहकर्मचाऱ्यां बरोबर प्रसंगाने पिणे हा काही गुन्हा होऊ शकत नाही. कदाचित किक बसणे आणि स्वत:वरचा ताबा घालवणे या दोन भिन्न घटना असतील. सोप्या भाषेत बोलायचे झाले तर जे लोक पहिल्या घटनेनंतर थांबतात ते लिमीटमधे आणि ज्याना दुसऱ्या घटनेनंतर थांबावं लागतं ते अनलिमीट बेवडे. मी या क्षेत्रात तज्ञ नसल्याने माझे हे शब्द प्रमाण म्हणून घेऊ नयेत. कशासाठी पितात याचे फारच कुतूहल असेल तर एखाद्या वाचकाने स्वत:च प्रयोग करून पहावा. जर प्रश्नाचे उत्तर सापडले तर लेखाच्या काॅमेंट मधे टाकावे.

नशा ही कायमच जीवंत मनाला हवी हवीशी असते. कोणी गायना मधे शोधतो तर कोणी वाद्यामधे, कोणी अधात्म्या मधे तर कोणी खेळामधे. जिथं माणसाला नशा होते तिथं तो सर्वस्व देतो. त्या नशेत असताना त्याला सुख दु:ख राग लोभ सर्व गोष्टींचा विसर पडतो. मद्याची या सर्व गोष्टींशी बरोबरी करणं मनाला पटणार नाही पण त्याचा परिणाम क्षणैक असेलही पण तसाच आहे. कोणत्या कारणासाठी मद्यपान करावं हा प्रश्न त्रयस्थाला पडणं गरजेचे नाही.
(हा खरंतर भाग १ होता. पण तो या पुर्वी आलाच नाही.)Sandeep Kulkarnihttps://www.blogger.com/profile/16028472631832149723noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4054357377414333792.post-43086373280466779002016-07-03T15:59:58.451+05:302016-07-03T15:59:58.451+05:30Sandy
ब्लॉग वर स्वागत .
विस्तृत प्रतिक्रियेबद्दल आ...Sandy
ब्लॉग वर स्वागत .
विस्तृत प्रतिक्रियेबद्दल आभार. प्रत्येकाच्या मताचा आदर.
मतंमतांतरं असणं हे आरोग्यदायी चर्चेचं लक्षण आहे.

आ. म.टी- एका न पिणारीनं दुसर्या न पिणार्याला अ.भा.बे.सं. चं अध्यक्षपद देणं बेकायदेशीर असल्यानं हा बेत रहित झालेला आहेशिनुhttps://www.blogger.com/profile/15679173236293000359noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4054357377414333792.post-39218489550152370542016-07-03T15:58:54.858+05:302016-07-03T15:58:54.858+05:30बरोबर. बरोबर. शिनुhttps://www.blogger.com/profile/15679173236293000359noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4054357377414333792.post-70001569222859390382016-07-03T15:57:55.153+05:302016-07-03T15:57:55.153+05:30Sandy
ब्लॉग वर स्वागत .
विस्तृत प्रतिक्रियेबद्दल आ...Sandy
ब्लॉग वर स्वागत .
विस्तृत प्रतिक्रियेबद्दल आभार. प्रत्येकाच्या मताचा आदर.
मतंमतांतरं असणं हे आरोग्यदायी चर्चेचं लक्षण आहे.

आ. म.टी- एका न पिणारीनं दुसर्या न पिणार्याला अ.भा.बे.सं. चं अध्यक्षपद देणं बेकायदेशीर असल्यानं हा बेत रहित झालेला आहेशिनुhttps://www.blogger.com/profile/15679173236293000359noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4054357377414333792.post-22214843336502769262016-07-02T18:06:26.620+05:302016-07-02T18:06:26.620+05:30आपण ज्या वातावरणात घडलो, वाढलो तेच विचार आपल्या मन...आपण ज्या वातावरणात घडलो, वाढलो तेच विचार आपल्या मनावर "संस्कार" या लेबला खाली घट्ट रोवले जातात. याचा अर्थ असा नाही की त्यापेक्षा काही भिन्न असणं हे वाईटच असलं पाहीजे. माझे इथले सिंगापूरचे चायनीज मित्र त्यांच्या सणासुदीला घर परिवारा बरोबर मद्यपान करतात. लहान मुलाना ते थंड पेये देऊन उत्साहामधे सामाविष्ट करून घेतात. पती-पत्नी, सासू-सासरे, भाऊ-वहिनी आदी सर्व एकत्र येऊन बीयर, वाईन, शॅंपेन यांची मस्त मजा लुटतात. यातून ते मला कदापि बेवडे किंवा संस्कारशून्य वाटत नाहीत. ही सर्व मंडळी लिमीट मधे पितात का नाहीत असा प्रश्न मला कधीच पडला नाही. माझा एक कोरियन सहकारी फुटबाॅलच्या मॅच च्या दुसऱ्या दिवशी संपूर्ण आॅफीसला त्याच्या गतरात्रीच्या मद्य पानाचा दुर्गंध द्यायचा. ज्यावेळी त्याच्या हे लक्षात आलं त्यावेळी त्यानं खजिल होऊन एक दिवस घरातूनच काम करणं किंवा सरळ रजा टाकणं पसंत केलं. या दोन्ही उदाहरणातील व्यक्ती त्यांच्या क्षेत्रात अतिशय हुशार, यशस्वी आणि वागण्यात नम्र सुस्वभावीच आहेत. त्यानी कधीही वर्ण भेद किंवा स्त्री चा अपमान किंवा बेपर्वाईची वर्तणूक केलेली नाही. सांगायचा मुद्दा हा की मद्यपान करणं हा काही संस्काराचा विषय होऊ शकत नाही.

कोणतीही गोष्ट अती करणं हे नेहमीच वाईट. मग ते मद्यपान असो वा इतर काहीही. अती कष्ट, अती जागरण, अती झोप, अती भोजन, अती हव्यास... सर्वच व्यर्ज करावं. मद्यपान याला अपवाद नाही.

विषयाचं तात्पर्य असे की मद्यपान हा फक्त प्रौढ व्यक्तीचा विषय रहावा. त्याला संस्काराशी जोडू नये. सोमरस पान आदी-अनादी कालापासून होत आले आहे. कोणताही समाज यातून सुटलेला नाही किंवा वाया पण गेलेला नाही. विषयाचा फार बाऊ करून उगाचच अल्प वयात कुतूहल निर्माण करू नये. मुलाना त्या पासून दूर ठेवावे. त्याच्या अती सेवनाचे दुष्परिणाम त्याना समजावून सांगावेत. शेवटी प्रत्येक व्यक्ती स्वत:च्या कर्मानेच जगत व भोगत असते. त्याना सैराट बनण्यापासून वाचवा. सकारात्मक दृष्टीकोन हा कोणत्याही परिस्थितीत उपयोगीच ठरतो.

सरते शेवटी एक उल्लेख करतो. मी इथं खो-खो कब्बडी यातील कोणताही खेळ खेळण्यास उत्सुक नाही. माझ्याकडून विषयाला इथेच पुर्णविराम.

वैधानिक इशारा: अती मद्यपान हे आरोग्यास हानीकारक अाहे, होतं आणि कायम राहणारच.

आ.म.टी. (आणखी मजकूर टिचभर): कृपया या माझ्या मतावर खुश होऊन मला "आखिल भारतीय बेवडा संघटने" चे अध्यक्ष पद देण्याचा प्रयत्न करू नये. मी पित नाही.Sandeep Kulkarnihttps://www.blogger.com/profile/16028472631832149723noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4054357377414333792.post-12699393888014731682016-07-01T08:04:08.794+05:302016-07-01T08:04:08.794+05:30Sagla agadi manaatla lihilayal.... Aswastha apan.....Sagla agadi manaatla lihilayal.... Aswastha apan.... Pan sex education itkach addiction education karna pan garajecha ahe khup ha vichar uttam ahe! As a parent aapla kaam ahe educate karna. Baki jyacha tyacha nasheeb mhanaycha!!arogya.comhttps://www.blogger.com/profile/14671308750864268283noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4054357377414333792.post-41178703734154019812016-06-30T22:57:00.809+05:302016-06-30T22:57:00.809+05:30खरंय....खरंय....शिनुhttps://www.blogger.com/profile/15679173236293000359noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4054357377414333792.post-10252909209723470772016-06-30T21:15:51.284+05:302016-06-30T21:15:51.284+05:30Hmmmmmmmmm...... samadhan karak uttarachi vaat bag...Hmmmmmmmmm...... samadhan karak uttarachi vaat baghtey... pan bahudha milel tya uttaravarach samadhan maanava laagel asa vattay.meghttps://www.blogger.com/profile/13632643483786741821noreply@blogger.com